For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडे -कोनापाल भजन स्पर्धेत पिंगुळी रवळनाथ प्रासादिक मंडळ प्रथम

12:05 PM Nov 26, 2023 IST | अनुजा कुडतरकर
निरवडे  कोनापाल भजन स्पर्धेत पिंगुळी रवळनाथ प्रासादिक मंडळ प्रथम
Advertisement

तर द्वितीय सद्गगुरुनाथ प्रासादिक मंडळ तुळस

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थान निरवडे कोनापाल आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत पिंगुळीच्या रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक तुळसचे सद्गगुरुनाथ प्रासादिक भजन मंडळ,तृतीय क्रमांक नेरुरचे मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळाने पटकाविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कुडाळचे उमळकर प्रासादिक भजन मंडळाला तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक कणकवलीचे लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाला देण्यात आला.
स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे-

उकृष्ट गायक - सचिन सावंत ( इसवटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड) उकृष्ट पखवाज - प्रज्योत खडपकर ( समाधी प्रासादिक भजन मंडळ,मळगाव ) उकृष्ट हार्मोनियम - अमित उमळकर ( उमळकर प्रासादिक भज मंडळ ) उकृष्ट तबला - साईप्रसाद नाईक ( महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी ) उकृष्ट झांजवादक - शिवराम सावंत ( इसवटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ) उकृष्ट कोरस - ( मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरुर ) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमाकांना ७००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक ३००१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम १५०१ रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय १५०१ व सन्मानचिन्ह तसेच गायक,हार्मोनियम वादक पखवाज वादक,तबला वादक,झांजवादक,कोरस यांना प्रत्येकी १००१ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत दहा भजन संघानी सहभाग घेतला होता.परिक्षक म्हणून हेमंत तवटे( कुडाळ ) व रुपेंद्र परब ( वडखोल ) यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन सतिश वारंग यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.