For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजची कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू; जुनी सांगवीतील घटना; तक्रार नसल्याने अकस्मात मृत्यूची नोंद, पोलिसांकडून चौकशी सुरु

06:07 PM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजची कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू  जुनी सांगवीतील घटना  तक्रार नसल्याने अकस्मात मृत्यूची नोंद  पोलिसांकडून चौकशी सुरु
Advertisement

पिंपरी-चिंचवड  : दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजची कमान उतरवित असताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली. सलमा पठाण असे मृत महिलेचे नाव आहे.

Advertisement

जुनी सांगवी, लेन क्रमांक 2 येथील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सव्वा दहाच्या सुमारास दहीहंडी फुटल्यानंतर कार्यक्रम संपला. दहीहंडी पाहण्यासाठी सलमा पठाण आणि त्यांचे पती सलाऊद्दीन पठाण आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सलमा घरी जात असताना स्टेजची कमान उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कमानीचा लोखंडी अँगल त्यांच्या अंगावर पडला.

या दुर्घटनेत सलमा पठाण गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी औंध रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

दरम्यान, स्टेज उभारण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती का, कमान उतरविण्याचे काम कोणाकडे सोपविण्यात आले होते, तसेच काम करताना सुरक्षेच्या योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. चौकशीनंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.