नातूवाडी,शिरवलीसह पिंपळवाडी धरण 'ओव्हर फ्लो'
खेड :
तालुक्यात जून महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे नातूवाडी, शिरवलीसह पिंपळवाडी धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे. यामुळे तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नातूवाडी धरणात १८.३७७ दलघमी पाणीसाठा असल्याची माहिती देण्यात आली. जून अखेरच्या आठवड्यात १५०० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मे महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मे महिन्याच्या मध्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने अनेकांची तारांबळ उडाली. यानंतर नियमित पाऊही मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाला. जून महिन्यातही पावसाचे थैमान सुरुच होते. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी शेतकऱ्यांची भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग करण्यात येत आहे. पिंपळवाडी धरणात १७.९४८ दलघमी, शिरवली धरणात ३.३६५ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तळवटपाल धरणात ४.६७ दलघमी, तर शेलारवाडी धरणात ८.०४६ दलघमी पाणीसाठा आहे.
तीनही धरणातून विसर्ग सुरू
नातूवाडी धरणात १८.३७ द.ल.घ.मी. साठा