For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवाहाच्या काही तासांनीच वैमानिकाचा मृत्यू

06:52 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
विवाहाच्या काही तासांनीच वैमानिकाचा मृत्यू
Advertisement

हेलिकॉप्टर दुर्घटना : नववधू बचावली

Advertisement

वृत्तसंस्था/ जॉर्जिया

अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये विवाहाच्या काही तासांनीच भारतीय वंशाचे वैमानिक डेव फिजी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत हेलिकॉप्टर वैमानिकाचाही मृत्यू झाला तर नववधू जेन्सी जखमी अवस्थेत जवळपास 6 तासांपर्यंत अवशेषांमध्ये अडकून पडली होती. नवविवाहित दांपत्य विवाहानंतर विशेष निरोपासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले होते, यानंतरच ही दुर्घटना घडली आहे.

Advertisement

डॉसनविल येथील ‘द रिवेरे’ वेडिंग वेन्यूत डेव फिजी आणि जेन्सी विवाहबद्ध झाले होते. या सोहळ्यात सुमारे 400 जण सामील झाले होते. विवाहानंतर दोघांसाठी हेलिकॉप्टरने रवाना होण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डेव आणि जेन्सी रॉबिन्सन आर66 हेलिकॉप्टरमधून डीकाल्ब-पीचट्री विमानतळावर जाणार होते, तेथून ते अटलांटासाठी रवाना होणार होते. परंतु उ•ाणाच्या काही वेळातच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते.

सर्वात आनंदाचा दिवस होता

माझा मुलगा अत्यंत आनंदी होता, मी त्याच्याकडे पाहत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद जाणवत होता असे डेवचे पिता जॉर्ज फिजी यांनी सांगितले. दुर्घटनेपूर्वी डेवने हवामानावरुन चिंता व्यक्त केली होती. सोहळा संपेपर्यंत परिसरात पाऊस अन् धुक्यामुळे दृश्यता जवळपास शून्य झाली होती. डेवने हेलिकॉप्टर वैमानिकाला अशा दृश्यतेत उ•ाण  योग्य नसल्याचे सांगितले होते. परंतु हेलिकॉप्टर वैमानिकाने अधिक उंचीवर उ•ाण करत राहू असे उत्तर देत प्रवास सुरू केला होता.

घनदाट जंगलात कोसळले हेलिकॉप्टर

उ•ाणाच्या काही वेळानंतर हेलिकॉप्टर डॉसनविल नजीक घनदाट जंगलात कोसळले. तेथील भौगोलिक स्थितीमुळे दुर्घटनास्थळाचा शोध घेण्यास वेळ लागला. याचमुळे बचाव अभियानही विलंबाने सुरु होऊ शकले. जेस्नी जवळपास 6 तासांपर्यंत दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरच्या अवशेषांमध्ये अडकून राहिली होती.

...सर्वकाही बदलून गेले

डेव फिजीचे आईवडिल मूळचे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्याच्या मुवट्टुपुझाचे रहिवासी आहेत. तर जेस्नीचा परिवार केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्याशी संबंधित आहे. देवाने आम्हाला एक परिपूर्ण विवाहाचा दिवस दिला, काही तासांनीच सर्वकाही आपत्तीत बदलून गेले. अशासमयी आमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत, असे उद्गार जॉर्ज फिजी यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.