भाविकांचे जथ्ये अन् सासनकाठ्यांनी वाडिरत्नागिरीचा मार्ग फुलला
भर उन्हातही घुमतोय चांगभलंचा अखंड गजर, पावलो पावली गुलालाची उधळण
कोल्हापूर प्रतिनिधी
पावलो पावली गुलालाची उधळण, चांगभलंचा अखंड गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर सासनकाठी नाचवताना जोतिबाची केली जाणारी आळवणी अशा वातावरणात महाराष्ट्रातील हजारो भाविक मंगळवार 23 रोजी होणाऱ्या चैत्रयात्रेनिमित्ताने दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी वाडीरत्नागिरीकडे निघाले आहेत. रविवारी तर पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला येऊन मिळालेल्या सर्व रस्त्यांवर प्रत्येक पाच मिनिटाला सासनकाठी पायी व वाहनाने घेऊन निघालेल्या भाविकांचे जथ्ये पहायला मिळत आहेत. तसेच शिवाजी पुलावरून वाडिरत्नागिरीला जाणाऱ्या रस्त्यावर भाविक गुलालीचा उधळण करत जणू मिरवणूकीचे चालले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरम्यान, कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या दर्शनाची आस घेऊन वाडिरत्नागिरीकडे जाताना भाविकांवर कडक उन्हाचा मारा होत आहे. मात्र या माऱ्यातूनही एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. वाटेत थोड्या थोड्या आंतरावर सासनकाठीसुद्धा नाचवल्या जात आहेत. चालताना आणि सासनकाठी नाचवताना भाविकांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा स्पष्टपणे दिसत आहेत. रविवारी दिवसभर उन्हाचा पारा 37 अंशावर गेला होता. हवेत आद्रताही अधिक प्रमाणात होती. पण तरीही जोतिबाची ओढ आणि आत्मशक्तीच्या जोरावर जोतिबाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर भाविक वाडिरत्नागिरीकडे निघाले होते. दुसरीकडे उन्हा-तान्हात भाविकांच्या घशाला थंडावा देण्यासाठी आंबेवाडी, केर्ले फाटा, वाडीरत्नागिरी अशा संपूर्ण मार्गात विविध मंडळांनी पिण्याच्या पाण्यासह सरबतची सोय केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणी व सरबत वाटपासाठी मंडळाचे कार्यकर्ते सकाळी 10 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत परिश्रम घेत आहेत.
वीस हजारावर भाविकांनी घेतला अन्नछत्रचा लाभ...
सहजसेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी वाडिरत्नागिरीच्या डोंगर पायथ्याला असलेल्या गायमुखाजवळ आयोजित केलेल्या अन्नछत्राला रविवारी प्रारंभ करण्यात आला. अन्नछत्राजवळ प्रथम आलेल्या भाविकांना मान देत त्यांच्याच हस्ते अन्नछत्राचे उद्घाटन केले. यानंतर दिवसभर सुऊ ठेवलेल्या अन्नछत्रातील मिष्ठान्नचा तब्बल 20 हजारावर भाविकांनी लाभ घेतला. यात्रा तयारीच्या बिझी शुडल्डूमधन वेळ काढत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अन्नछत्राला भेट दिली. शेकडो भाविकांना त्यांनी स्वयंस्फुर्तीने जेवण भरवले. अन्नछत्राशेजारी मोफत डोळे तपासणी शिबिरही सुऊ केले आहे. या शिबिरालाही भाविकांनी प्रतिसाद दिला. दिवसभरात 263 भाविकांच्या डोळ्यांच्या तज्ञांनी तपासणी केली, असे ट्रस्टचे विश्वस्त प्रमोद पाटील यांनी सांगितले.
आजपासून दोन अन्नछत्र व नाश्ता वाटपाला सुऊवात
शिवाजी चौक तऊण मंडळाच्या वतीने पंचगंगा नदी घाटावर आणि जोतिबा डोंगरावरील एस. टी. स्टॅण्डना†जकच्या जागेत आर. के. मेहता चा†रटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवार 22 रोजीपासून मोफत अन्नछत्राचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर सौराष्ट्र कडवा पटेल समाजाच्या वतीने नदी घाटावर नाश्ता वाटपाला सुऊवात केली जात आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत नाश्ता वाटप करण्यात येणार आहे. बुधवार 24 एप्रिलपर्यंत नाश्ता वाटप सुऊ राहणार आहे, असे कडवा पटेल समाजाचे अध्यक्ष दिलीपशेठ धिंगाणी, शिवाजी चौक तऊण मंडळाच्या अल्पोहार कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.
मोफत शॉवर बाथची साय...
पंचगंगा आरती भक्त मंडळ व पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने पंचगंगा नदी घाटावर भाविकांसाठी मोफत शॉवर बाथची (आंघोळ) सोय करण्यात आली आहे. सोमवार 22 रोजीपासून या शॉवर बाथला सुऊवात केली जात आहे. महिला व पुऊषांसाठी बंदीस्त स्वऊपात प्रत्येकी 12 शॉवरची सोय केली आहे. 25 रोजीपर्यंत ही सोय कार्यरत ठेवली जाणार आहे. पंचगंगा नदीमध्ये स्नान करताना अनुचित प्रकार घडत असतात. हा प्रकार कुठे तरी थांबावा म्हणून भाविकांसाठी शॉवर बाथची सोय केली असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.