For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डुकराचा आवाज काढण्याची स्पर्धा

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
डुकराचा आवाज काढण्याची स्पर्धा
Advertisement

दिग्गज लोक होत असतात सहभागी

Advertisement

सर्वसाधारणपणे तुम्ही शर्यत, नृत्य, गायन किंवा खाण्यापिण्याच्या स्पर्धेविषयी ऐकले असेल. परंतु कधी जिंकण्यासाठी डुकरासारखा आवाज काढाव्या लागणाऱ्या स्पर्धेविषयी ऐकले आहे का? फ्रान्सच्या एका छोट्या गावात दरवर्षी काहीशी अशाच प्रकारची अनोखी स्पर्धा आयोजित होत असते. या स्पर्धेत स्पर्धक स्वत:च्या आवाजाने डुकराची हुबेहुब नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

फ्रान्सच्या दक्षिण-पश्चिम हिस्स्यात स्थित ट्रिए सुर बाइसे गावात यंदाही एका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान सर्वाधिक चर्चा राहिली वार्षिक पिग-स्क्वीलिंग चॅम्पियनशिपची. या स्पर्धेत माणसांना डुकराच्या ओरडण्याचा किंवा गुरगुरण्यासारखा आवाज काढून परीक्षकांना प्रभावित करायचे असते. ही स्पर्धा केवळ स्वत:च्या अजब शैलीमुळे खास नाही, तर ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक पोहोचत असतात. यंदा या महोत्सवाचे 43 वे वर्ष होते. आयोजकांनुसार सुमारे 4 हजार लोक यात सहभागी झाले आहेत. खास बाब म्हणजे गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार इतकीच आहे. म्हणजेच एका दिवसासाठी हे गाव हजारो लोकांनी बहरून गेले होते.

Advertisement

लोक स्पर्धेत आळीपाळीने डुकराच्या आवाजाची नक्कल करताना पाहत असतात आणि त्यांच्या कामगिरीचा आनंद घेतात. स्पर्धेत फ्रान्सच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून आलेले लोकही सहभागी होत असतात. यंदा स्पर्धेत टूलूज येथे राहणारा एक मेक्सिकन इंजिनियरिंगचा विद्यार्थी सामील झाला होता. स्पर्धक स्वत:चा आवाज अन् शैलीने डुकराच वेगवेगळ्या प्रकारचे सूर काढण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर परीक्षक त्यांची कामगिरी पाहून विजेत्याचा निर्णय घेतात. येथे जिंकण्यासाठी शर्यतीत धावावे लागत नाही, तसेच अवघड प्रश्न सोडवावा लागत नाही. केवळ आवाजाची अशी कमाल करावी लागते की परीक्षकांना याहुन चांगला डुकराचा आवाज केवळ खरा डुकरच काढू शकेल असे वाटावे.

9 वेळा विजयी नोएल जामे

या अजब परंतु लोकप्रिय स्पर्धेत एक नाव खास स्वरुपात चर्चेत राहते. या इसमाचे नाव नोएल जामे असून त्याने ही स्पर्धा 9 वेळा जिंकली आहे. यंदाही नोएल जामे स्वत:चे वर्चस्व कायम राखण्यासाठी स्पर्धेत उतरला होता. अशास्थितीत इतर स्पर्धकांसमोरील आव्हान केवळ चांगल्या कामगिरीचे नव्हते तर 9 वेळा विजयी राहिलेल्या चॅम्पियनवर मात करण्याचे होते.

अशाप्रकारची स्पर्धा का?

पिग-स्क्वीलिंग चॅम्पियनशिप या गावात होणाऱ्या वार्षिक महोत्सवाची एक अनोखी ओळख ठरला आहे. हे आयोजन गावाच्या स्थानिक परंपरा आणि डुकरांशी निगडित ग्रामीण जीवनाला एका मजेशीर शैलीत लोकांसमोर सादर करते. या महोत्सवादरम्यान गावात मोठ्या संख्येत लोक जमतात, ही स्पर्धा मनोरंजनाचे खास आकर्षण ठरते. आता भले ही स्पर्धा विचित्र वाटत असली तरीही ट्रिए सुर बाइसे गावासाठी या आयोजनाची दरवर्षी प्रतीक्षा केली जाते. येथे माणूस काही काळासाठी स्वत:चा आवाज विसरून ‘डुक्कर’ होण्याचा प्रयत्न करतो, हजारो लोक या अनोख्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पोहोचत असतात.

Advertisement
Tags :

.