For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंगोलीवरुन पंढरपुर कडे जाणारा पिकअप पलटी; एक ठार; तेरा जखमी

04:40 PM Dec 21, 2023 IST | Kalyani Amanagi
हिंगोलीवरुन पंढरपुर कडे जाणारा पिकअप पलटी  एक ठार  तेरा जखमी
Advertisement

कुर्डुवाडी प्रतिनिधी

Advertisement

हिंगोलीवरून पंढरपूर कडे प्रवासी घेऊन जाणारा पिकअप कुर्डुवाडी - शेटफळ रस्त्यावर बावी शिवारात सिद्धेश्वर मंदिराजवळ पलटी झाला. या अपघातात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष व बालकांचा समावेश आहे.ही घटना गुरुवार दि.२१ रोजी पहाटे ५ वा. सुमारास कुर्डुवाडी- शेटफळ रोडवर घडली. जयजयराम शिंदे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील ता.सेनगाव येथील लोक नातेवाईकाकडे पुण्यतिथीच्या निमित्ताने बुधवार दि.२० रोजी पिक-अप क्र एम एच ३८ एक्स १४४ ने पंढरपूरकडे निघाले होते. दरम्यान दि.२१ रोजी गुरूवारी पहाटे ५ वा सुमारास गाडी कुर्डुवाडी शेटफळ रोडवर बावी शिवारात सिद्धेश्वर मंदिराजवळ आली असताना सदर पिक-अप चालकास डुलकी लागल्याने पिक-अप रस्त्याच्या कडेला खड्ड्यामध्ये पलटी झाला. यामध्ये जयजयराम शिंदे वय ३५ याचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मृ्त्यू झाला. तर अर्चना केळे वय २२ जानरुण,रोडगे,देहुबाई ज्ञानोबा दरोगे वय ५० रा. दाताळा ता.सेनगाव,प्रभावती जयजयराम शिंदे वय ३० दाताळा ता.सेनगाव,कानबा अंबर दरोगे वय ६० रा.दाताळा ता.सेनगाव, ज्ञानेश्वर विठ्ठल केळे वय २७ रा.जानरुण रोडगे,भास्कर गेनुजी गाडे वय ४० रिधोरा ता.सेनगाव,सुधाकर दाजिबा कोटकर वय ५० वरुड ता.सेनगाव,सरस्वती गजानन शिंदे वय ३० रा.दाताळा ता.सेनगाव,रूक्मिणी विठ्ठल केळे रा.कंकरवाडी ता.सेनगाव,चंद्रभागा संतोष नलवडे वय ३४ तरडगाव ता.सेनगाव,प्रयागाबाई संजय सरकटे वय ४० रा.समगा ता.सेनगाव,गजानन कौतिका शिंदे वय ३६ रा. दाताळा ता.सेनगाव असे एकूण १३ जण जखमी झाले आहेत. जखमी मधील ९ जण सोलापुर येथील सिव्हिल हाॅस्पीटल येथे हलविण्यात आले आहेत.यामध्ये एक गरोदर महिला असून तिला मांडीला मार लागला आहे.

Advertisement

अपघात झाल्याचे कळताच कुर्डुवाडी चे १०८ क्रमांक ॲम्बुलन्स चालक संतोष चव्हाण आणि डॉक्टर ओंकार मोहिते तसेच शेटफळच्या 108 क्रमांकाचे चालक आप्पा राऊत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना कुर्डुवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक सुनंदा रणदिवे,डाॅ.प्रद्युम्न सातव व ब्रदर, नर्स यांनी वेळेत प्राथमिक उपचार करुन रूग्णांना सोलापुर सिव्हिल हाॅस्पीटल येथे हलविले आहे.

Advertisement
Tags :

.