For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारी घाटात महिंद्रा पिकअपला अपघात

11:48 AM Oct 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तिलारी घाटात महिंद्रा पिकअपला अपघात
Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

Advertisement

तिलारी घाटातील अपघातग्रस्त जयकर पॉईंट येथे टोमॅटो वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीला बुधवारी पहाटे अपघात झाला.या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की बेळगावहून म्हापसा- गोवा येथे टोमॅटोची वाहतूक करत असताना बुधवारी पहाटे तिलारी घाटातील अपघातग्रस्त जयकर पॉईंट येथे पिकअप गाडी आली. गाडीवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. यात पिकअप गाडी पलटी झाली व गाडीतील प्लास्टिक ट्रे मध्ये असलेल्या टोमॅटोचे हजारों रुपयांचे नुकसान झाले आहे.अपघातात गाडी व आतील सामानाचे मोठे नुकसान झाले असून चालक व त्याचा साथीदार सुखरूप आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.