रोटरी क्लबच्या माध्यमातून सावंतवाडीत फिजिओथेरपी सेंटर
सावंतवाडी | प्रतिनिधी
रोटरी क्लब सावंतवाडी संचलित रोटरी ट्रस्ट यांच्यातर्फे सावंतवाडी शहरामध्ये फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे, या सेंटरमध्ये अद्यावत उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या सेंटरमध्ये अँजेलो रॉड्रिक्स या बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पदवीधर व अनुभवी फिजिओथेरपिस्ट सेवेसाठी उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी असे हे पहिलेच केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोस्कर व सचिव प्रवीण परब यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात आता भगीरथ प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब आणि शासनाच्या माध्यमातून बायोगॅस प्रकल्प गावागावात राबवण्याच्या दृष्टीने आमचा संकल्प आहे. सावंतवाडी ,चौकूळ बेरडकी, येथे वीस बायोगॅस व त्या गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात जवळपास 200 हून अधिक बायोगॅस उभारून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. रोटरी क्लब तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री सातोस्कर म्हणाले गेल्या वर्षभरात रोटरी क्लब तर्फे आम्ही विविध उपक्रम राबविले मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये जाऊन वाचक तयार केलेत. तसेच बेरडकी येथील मुले जाण्यासाठी ५ किलोमीटर पायपीट करायची त्यांना सायकलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य ,शिक्षण या दृष्टीने आम्ही विविध उपक्रम राबविले. ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन शिबिरही आयोजित केले आहे. आता सावंतवाडी शहरात फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. अद्यावत असे हे सेंटर असून या ठिकाणी सर्व सुविधा आहेत तसेच रोटरी क्लबच्या या इमारतीत यापुढे बहुउद्देशीय हॉल सर्वांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले .
फिजिओथेरपीची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी ५ ते ८अशी राहील.इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सार्वजनिक उपक्रमासाठी एसी हॉल माफक दरात उपलब्ध करण्यात येत आहे . तरी या सर्व सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती रोटरी क्लब व रोटरी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी श्रीमती विनया बाड, श्री. आबा कशाळीकर ,खजिनदार रोटरी क्लब सावंतवाडी रो प्रमोद भागवत , रो सुबोध शेलटकर,, रो आनंद रासम , रो राजू पनवेलकर, रो दिलीप म्हापसेकर व इतर मंडळी उपस्थित होती.