कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिजिक्स वाला यांचा येणार आयपीओ

06:32 AM Mar 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता :

Advertisement

एज्युटेक क्षेत्रातील युनिकॉर्न कंपनी फिजिक्स वाला यांचा आयपीओ लवकरच शेअरबाजारात लाँच होणार आहे. कंपनीने सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच बाजारातील नियामक सेबी यांच्याकडे आयपीओ संबंधीत अर्जाची कागदपत्रे सादर केली आहेत. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 4600 कोटी रुपये जमविण्याची योजना बनवत आहे. नवे ताजे इक्विटी समभाग सादर करण्यासोबतच ऑफर फॉर सेल अंतर्गतसुद्धा समभाग कंपनी विक्रीला उपलब्ध करू शकते. स्वीगी, विशाल मेगामार्ट, टाटा प्ले, ओयो, क्रेडिला फायनॅन्शियल सर्व्हिस आणि इंदिरा आयव्हीएफ यांच्यानंतर सेबीकडे अर्ज करणारी फिजिक्स वाला ही सातवी प्रमुख कंपनी बनली आहे.

Advertisement

कधी झाली कंपनीची स्थापना

अलख पांडे आणि प्रतिक महेश्वरी या दोघांनी 2020 मध्ये वरील कंपनीची स्थापना केली होती. ही एज्युटेक प्लॅटफार्म चालविणारी कंपनी आहे. हॉर्नबिल कॅपिटल, लाईटस्पीड वेंचर्स, वेस्ट ब्रीज आणि जीएसव्ही वेंचर्स यासारख्या गुंतवणूकदारांचा भक्कम पाठिंबा आहे. युट्यूबच्या माध्यमातून कंपनीचा प्रवास सुरू झाला होता. एनसीईआरटी, नीट, जेईई मेन्स आणि इतर परीक्षांची प्रश्नपत्रिका कंपनी उपलब्ध करत असते. 35 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. युट्यूबचे सबस्क्राइबरची संख्या 78 लाखांपेक्षा अधिक आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article