For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime: नपुंसक म्हटल्याने खून, फुलेवाडीतील गुडांच्या खूनाची A to Z कहाणी

11:57 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur crime  नपुंसक म्हटल्याने खून  फुलेवाडीतील गुडांच्या खूनाची a to z कहाणी
Advertisement

शिवाय गँगमधील साथिदारांमध्ये म्होरक्या आदित्यला तो नपुंसक म्हणत होता

Advertisement

कोल्हापूर : शहरातील फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉनलगत शुक्रवारी मध्यरात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख याचा खून झाला. या खुनामागील कारण पोलीस तपासात स्पष्ट झाले. महेशने गँगच्या प्रमुखाच्या पत्नीस फूस लावून पळवून नेले होतेच. शिवाय गँगमधील साथिदारांमध्ये म्होरक्या आदित्यला तो नपुंसक म्हणत होता. हे आदित्यला समजल्याने त्याने त्याचा काटा काढला.

आदित्य गवळी या गुन्हेगाराने स्वत:ची अशी गवळी गँग तयार केली. या गँगच्या भाईगिरीत महेश राख हा सहभागी होवून, तो देखील गुन्हेगारी कारनामे करु लागला. यामुळे तो गँगचा म्होरक्या आदित्य गवळीच्या जवळचा विश्वासू म्हणून ओळखू लागला. त्याचे गवळीच्या घरी येणे-जाणे वाढले. त्यातून त्याच्या पत्नीशी त्याची ओळख झाली.

Advertisement

या ओळखीतून त्याच्यामध्ये नाजूक संबंध निर्माण झाले. त्यातून त्याने गँग प्रमुखाच्या पत्नीस सुमारे दीड वर्षांपूर्वी फुस लावून पळवून नेऊन स्वत:च्या घरी ठेवले होते. याचदरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्याला हद्दपार केले. हद्दपारीची मुदत 10 स्पटेंबर 2025 रोजी संपल्याने घरी परत आला. तो गँगचा म्होरक्याला टोळीतील साथिदारांमध्ये नपुंसक असे म्हणू लागला.

याची माहिती आदित्य गवळीला समजली. त्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन तयार कऊन, त्याच्यावर पाळत ठेवली. यावेळी तो रात्री 10 नंतर घरी येतो. अशी माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री त्याच्या घरी आदित्य गवळी, त्याचा भाऊ सिद्धांत गवळीसह 10 ते 12 साथिदारांनी घातक शस्त्रे घेऊन धाव घेतली. पण तो घरी नसल्याने गवळी गँगने दशहत निर्माण करीत, त्याच्या घरावर बीयरच्या बाटल्या आणि दगडफेक करुन मोडतोड केली.

याचदरम्यान महेशचा साथिदार विश्वजित फाले हा त्याच्या हाती लागला. त्याच्यावर खुनी हल्ला करुन गंभीर जखमी केले. दरम्यान, महेश घराकडे येत असल्याची माहिती या गँगला समजली. त्यांनी त्याचा पाठलाग करुन, रस्त्यात अडवून त्याच्यावर घातक शस्त्राने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी गवळी गँगचा म्होरक्या गुन्हेगार आदित्य गवळीसह 10 ते 12 जणाविरोदी गुन्हा दाखल झाला आहे. म्होरक्याच्या पत्नीशी घटस्फोटानंतर करणार होता विवाह गुन्हेगार महेश राखने पळवून आणलेल्या गँग प्रमुखाच्या पत्नीचा त्याच्यापासून घटस्फोट घेण्याबाबत हालचाली सुरु केल्या होता.

घटस्फोट होताच तो तिच्याशी विवाह करणार होता. पण विवाहपूर्वीच त्याचा गँगचा म्होरक्याने साथिदारांच्या मदतीने त्याचा गेम केला. महेश विरोधी शहरातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वऊपाचे गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Tags :

.