कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Crime : फुलेवाडीत गुंडाचा पाठलाग करुन खून, हल्ल्यात तलवार, एडकाचा वापर

11:03 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पत्नीला फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून हा खून करण्यात आला

Advertisement

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवर गुंडाचा पाठलाग करुन खून केला. महेश राजेंद्र राख (वय 23, रा. अहिल्याबाई होळकरनगर, फुलेवाडी रिंगरोड) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी गवळी गँगचा म्होरक्या आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य गवळीसह त्याच्या 10 ते 12 साथीदारांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

महेश राख याने गवळी याच्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून हा खून करण्यात आला, अशी माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी शनिवारी दिली. यावेळी राख याचा साथीदार विश्वजीत भागोजी फाले (वय 19, रा. गंधर्वनगरी, फुलेवाडी) याच्यावरही हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

गवळी गँगचा प्रमुख आदित्य शशिकांत गवळी, त्याचा भाऊ सिद्धांत शशिकांत गवळी (दोघे रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) साथीदार धीरज शर्मा (रा. रामानंदनगर), ऋषभ साळोखे ऊर्फ मगर (रा. पाचगाव), मयूर कांबळे (रा. साने गुरुजी वसाहत), पियुष पाटील (रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), सद्दाम कुंडले (रा. बी. डी. कॉलनी) यासह अन्य चार अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या सर्वांनी तलवार, एडका, फायटर, लोखंडी पाईप, काठी आदींचा वापर करुन राख याच्यावर हल्ला केला. तसेच घरावर बियरच्या बाटल्या आणि दगडफेक कऊन तोडफोड केली. या प्रकाराने परिसरात दहशत पसरली होती. याबाबत अधिक माहिती अशी, आदित्य गवळीने गँगच्या माध्यमातून शहरासह उपनगरात दहशत निर्माण केली होती. या गँगमध्ये महेश राख सहभागी झाला होता.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. राख याचे गवळीच्या घरी येणे-जाणे वाढले होते. याचदरम्यान त्याचे आदित्यच्या पत्नीशी नाजूक संबंध निर्माण झाले. त्यातून त्याने तिला दीड वर्षापूर्वी पळवून नेऊन स्वत:च्या घरी ठेवले. यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होता. दोन दिवसांपूर्वी राख याची आदित्यच्या काही साथीदारांबरोबर शाब्दीक बाचाबाची झाली होती.

यावेळी राख याने आदित्य विषयी अपशब्द वापरला होता. याचा त्यांना राग आला होता. राख याचा काटा काढण्यासाठी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानुसार शुक्रवारी रात्री आदित्य आणि त्याच्या साथीदारांनी राख याच्या घराकडे मोर्चा वळवला. यावेळी तो घरात नसल्याने त्यांनी बियरच्या बाटल्या आणि दगडफेक कऊन घराची तोडफोड केली.

यानंतर थोड्या वेळाने राख घराकडे आला. शेजारी दबा धरून बसलेल्या आदित्य आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर तलवार, एडका, फायटर, लोखंडी पाईप, काठीने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तेथून संशयित आरोपींनी पलायन केले.

याची माहिती समजताच राख याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीसउपअधीक्षक सुजितकुमौर क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सीपीआर आणि घटनास्थळी धाव घेतली.

हा खून रेकॉर्डवरील गवळी गँगचा म्होरक्या आदित्य गवळी आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती समोर आली. यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून शोध घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नाहीत.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#crime news#Fulewadi#kolhapur crime#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediapolice investigation
Next Article