For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिंचेच्या झाडाला खिळ्याने ठोकले युवक-युवतीचे फोटो; कसबा तारळेत काळ्या जादूचा थरार

02:02 PM Apr 27, 2026 IST | NEETA POTDAR
चिंचेच्या झाडाला खिळ्याने ठोकले युवक युवतीचे फोटो  कसबा तारळेत काळ्या जादूचा थरार
Advertisement

                         कसबा तारळे गावात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार

Advertisement

कसबा तारळे -कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे कथीत भानामती काळ्या जादूचा एक प्रकार उघडकीस आला, कसबा तारळे येथील विठ्ठलाई मंदिरामागे रांगोळी व त्यावर काळ्या रंगाचे बाहुले, हळद-कुंकू टाकून रांगोळीसारखे तांत्रिक चिन्ह अशा स्थितीमध्ये भानामती प्रकार लोकांच्या निदर्शनास आला.

हे ठिकाण गावच्या अगदी मध्यभागी असल्याने हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. असाच काहीसा प्रकार नदी घाटाशेजारील स्मशान शेडच्या मागील बाजूस निदर्शनास आला आहे. एका गर्द झाडीत चिंचेच्या झाडावर युवक आणि युवतीचे फोटो, काळी बाहुली खिळ्यामध्ये मारलेले पाहवयास मिळाले आहे. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. अशा अघोरी कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ नुसार भानामती, करणी, जादूटोणा करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. असा गुन्हा उघडकीस आल्यास ६ महिने ते ७वर्ष कैद दंड अशी शिक्षा आहे. ही माहिती स्थानिक युवकांना समजताच दीपक पाटील, रमेश साबळे, शैलेश माझगावकर, रोहित पाटील, निलेश जाधव, अनिकेत शिपेकर या धाडसी सामाजिक कार्यकर्ते युवकांनी सदरचे बाहुले दहन करून नष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.