For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छायापत्रकार सतिश कुंकळकर यांचे निधन

03:01 PM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
छायापत्रकार सतिश कुंकळकर यांचे निधन
Advertisement

कुंभारजुवे : गावांतवाडा-कुंभारजुवे येथील रहिवासी आणि दैनिक तरुण भारतचे माजी छायापत्रकार सतिश गोविंद कुंकळकर (52 वर्षे) यांचे काल मंगळवारी दुपारी निधन झाले. अंत्यसंस्कार संध्याकाळी गावांतवाडा येथील स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट, गोवा छायापत्रकार संघटना, तसेच तिसवाडी पत्रकार संघाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिसवाडी पत्रकार संघाचे ते सुरुवातीपासूनचे सदस्य तसेच काही काळ उपाध्यक्ष होते. दै. तरुण भारतच्या कार्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Advertisement

कुंकळकर यांनी कुंभारजुवे येथून ग्रामीण पत्रकारितेस सुरुवात केली. नंतर विविध वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिता केली. आपल्या लेखणीतून त्यांनी कित्येक सामाजिक विषयांना वाचा फोडली. वार्तांकन व छायांकन ही दोन्ही कामे त्यांनी केली. आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात त्यांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, लुसोफोनिया गेम्स, आंतरराष्ट्रीय परिषदा, विविध संमेलने, नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, आंदोलने अशा विविध घटनांचे छायाचित्रण त्यांनी केले होते. ते भजनी कलाकार होते. उत्कृष्ट गवळण गायक होते. त्यांच्या वाड्यावरचे ते पहिले पदव्युत्तर पदवीधारक होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.