For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आदित्य एल-1 ने काढले सूर्याचे छायाचित्र

06:35 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
आदित्य एल 1 ने काढले सूर्याचे छायाचित्र
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आदित्य-एल 1 मोहिमेच्या यशाचा पहिला पुरावा मिळाला आहे. या सॅटेलाईटच्या सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याची पहिल्यांदाच फुल डिस्क छायाचित्रे काढली आहेत. ही सर्व छायाचित्रे 200 ते 400 नॅनोमीटर वेवलेंथची आहेत, म्हणजेच सूर्य 11 वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसून येत आहे.

आदित्य-एल1 च्या एसयुआयटी पेलोडला 20 नोव्हेंबर रोजी सक्रीय करण्यात आले होते. या टेलिस्कोपने सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरची छायाचित्रे काढली आहेत. फोटोस्फेयर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फेयर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि बाहेरील वायुमंडळामधील आवरण. क्रोमोस्फेयर सूर्याच्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटर उंचीपर्यंत असते. यापूर्वी सूर्याचे छायाचित्र 6 डिसेंबर रोजी काढण्यात आले होते, परंतु ती पहिली लाइट सायन्स इमेज होती. परंतु यावेळी फुल डिस्क इमेज काढण्यात आली आहे. म्हणजेच सूर्याचा जो हिस्सा पूर्णपणे समोर आहे, त्याचे छायाचित्र. सूर्यावरील डाग आणि अन्य हिस्से या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहेत. या छायाचित्रांच्या मदतीने वैज्ञानिक सूर्याचे अध्ययन अधिक चांगल्याप्रकारे करू शकतील.

Advertisement

एसयुआयटीची निर्मिती पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स, मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, सेंटर फॉर एक्सीलेंस इन स्पेस सायन्स इंडियन, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर ऑब्जर्व्हेटरी, तेजपूर विद्यापीठ आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी मिळून केली आहे.

Advertisement
Tags :

.