फोनपेचे नवीन एआय टूल लाँच
या बदलामुळे कामाचा वेग वाढणार : व्यापाऱ्यांनाही होणार अधिकचा लाभ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
डिजिटल पेमेंट कंपनी फोनपेने एक नवीन एआय-आधारित टूल लॉन्च केले आहे, जे व्यापाऱ्यांसाठी पेमेंट गेटवे सुरू करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद काम करत असल्याची माहिती आहे. यामध्ये जे काम करण्यासाठी पूर्वी आठवडे लागायचे, ते आता या नवीन फीचरमुळे फक्त काही मिनिटांत करता येणे शक्य होणार असल्याची माहिती आहे.
फोनपेचे नवीन एआय-आधारित टूल कसे काम करते
फोनपेची नवीन प्रणाली एक एआय-शक्तीवर चालणारा इंटिग्रेशन लेयर आहे, जो विशेषत: व्यापाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. याच्या मदतीने, कंपन्या जास्त तांत्रिक ज्ञानाशिवाय त्यांच्या सिस्टीममध्ये फोनपे पेमेंट गेटवे जोडू शकतात. हे टूल एका एआय कोडिंग असिस्टंटसोबत काम करते आणि इंटिग्रेशन इंटेलिजन्स नावाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊन ती सोपी करते.
या नवीन एआय टूलद्वारे, व्यापारी एका साध्या संभाषणातून पेमेंट गेटवे इंटिग्रेट करू शकतात. पूर्वी, जिथे डेव्हलपर्सना कोडिंग, डॉक्युमेंट्स वाचणे आणि वारंवार टेस्टिंग करण्यात बराच वेळ घालवावा लागत असे, तिथे आता तेच काम एकाच वेळी पूर्ण करता येते. ही सिस्टीम स्वत:च सिग्नेचर कोड तयार करते, त्रुटी हाताळते आणि पेमेंट एपीआय योग्यरित्या लागू करते.
कंपनी एआय क्षेत्रात आणखी नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. फोनपेचे सीटीओ आणि संस्थापक राहुल चारी म्हणाले की, हा एआय एजंट केवळ कोडच तयार करत नाही, तर पेमेंट सिस्टीमदेखील समजून घेतो. त्यांनी असेही सांगितले की, कंपनी एआय क्षेत्रात आणखी नवीन फीचर्स आणण्याची योजना आखत आहे.