For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोन पे अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी ‘इंडस’ अॅपस्टोअर लाँच

06:41 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोन पे अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी ‘इंडस’ अॅपस्टोअर लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

वॉलमार्ट-गुंतवणूक केलेल्या फोनपेने अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ‘इंडस अॅपस्टोर’ लाँच केले आहे. अॅपच्या अबाऊट असनुसार, इंडस अॅपस्टोअरमध्ये सुमारे 4 लाख अॅप्स आहेत जे 12 भारतीय भाषांमध्ये शोधले आणि डाउनलोड केले जाऊ शकतात.

फोन पे चे सीईओ आणि संस्थापक समीर निगम म्हणाले की, इंडस अॅपस्टोरने मोबाईल अॅप मार्केटमध्ये निकोप स्पर्धा करण्याचे योजले आहे. हे अधिक लोकशाही आणि दोलायमान भारतीय डिजिटल प्रणाली तयार करण्यात मदत करेल.

Advertisement

फोनपेकडून सप्टेंबर 2023 मध्ये विकसकांना आमंत्रण

याद्वारे कंपनीला अँड्रॉईड अॅप वितरणातील गुगलच्या मत्तेदारीला आव्हान द्यायचे आहे. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये अँड्रॉईड अॅप डेव्हलपरना त्यांच्या अॅप्सची यादी करण्यासाठी आमंत्रित केले होते.

1 वर्षासाठी अॅप सूचीसाठी कोणतेही शुल्क नाही

अॅप डेव्हलपरला आमंत्रित करताना, फोनपेने सांगितले होते की इंडस डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर अॅप सूची पहिल्या वर्षासाठी विनामूल्य असेल. यानंतर दरवर्षी नाममात्र शुल्क आकारले जाईल. एका वर्षानंतर विकासकाकडून किती वार्षिक शुल्क आकारले जाणार आहे, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.

इंडस अॅपस्टोअरचे मुख्य उत्पादन अधिकारी आणि सह-संस्थापक आकाश डोंगरे यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते, ‘भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 2026 पर्यंत 1 अब्जाहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. यामुळे आम्हाला स्थानिक पातळीवर अधिक काम करण्याची मोठी संधी मिळते.

Advertisement
Tags :

.