विना सिम-नेटवर्कचा फोन लाँच
आता सॅटेलाईटच्या मदतीने चालणार बीएसएनएलचा फोन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने भारतात एक नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. करासहित याची किंमत 1,34,166 रुपये आहे. हा फोन सामान्य स्मार्टफोनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, जो सिम आणि नेटवर्कशिवाय काम करण्याऐवजी थेट सॅटेलाइटच्या मदतीने चालतो.
या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे, नेटवर्क नसलेल्या आणि ऑफ-ग्रिड भागातही कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हॉइस कॉल करण्याची सुविधा मिळते, तर सामान्यत: वापरले जाणारे फोन जवळपासच्या मोबाईल टॉवरच्या मदतीने काम करतात. सॅटेलाइट फोन खरेदी करण्यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे.
आपत्कालीन परिस्थितीत कनेक्टिव्हिटी सोपी होईल.
या फोनचा फायदा अशा दुर्गम भागातही होईल, जिथे मोबाईल नेटवर्क पोहोचू शकत नाही. यामुळे आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत लोकांशी संपर्क साधणे सोपे होईल. कंपनीने सांगितले की, हा हँडसेट जागतिक सॅटेलाइट नेटवर्क प्रदाता ‘इनमारसॅट’च्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे.
खरेदी करण्यासाठी सरकारी परवानगी अनिवार्य आहे. हा आपल्या फोन किंवा गॅझेट्सप्रमाणे थेट दुकानात मिळणार नाही. भारतात सॅटेलाइट फोनबाबत कडक नियम आहेत. हा फोन खरेदी करण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी, वापरकर्त्याला दूरसंचार विभागाकडून (डिओटी) मंजुरी किंवा अधिकृतता घेणे अनिवार्य असेल.
....तर कायदेशीर कारवाई होणार
सरकारी मंजुरीशिवाय सॅटेलाइट फोन बाळगल्यास किंवा चालवल्यास भारतीय कायद्यानुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. बीएसएनएलचा हा सॅटेलाइट फोन रोजच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी नाही. हा अशा लोकांसाठी आणि संस्थांसाठी तयार करण्यात आला