फंटोम स्टार्स टे.टे. स्पर्धेत विजेता
वृत्तसंस्था/मुंबई
येथे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या टेबल टेनिस सुपर लीग सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या फंटोम स्टार्स संघाने दर्जेदार कामगिरीचे दर्शन घडवित विजेतेपद पटकाविले. विजेत्या फंटोम स्टार्स संघामध्ये स्थानिक दर्जेदार युवा टेबल टेनिसपटूंचा समावेश करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्पया फंटोम स्टार्स संघाने सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत आपला कामगिरीत सातत्य राखताना साखळी आणि त्यानंतरच्याबाद फेरीतील 7 सलग लढती जिंकल्या. त्यानंतर यास्पध्घ्xच्याअंतिम फेरीतील लढतीत फंटोम स्टार्सने पीबीजी पुणे जॉगर्स संघाचा 14-8 अशा फरकाने पराभव केला. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील नव्या पिडीतील युवा टेबल टेनिसपटूंचा शोध घेणे सोपे झालेले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिव्यानीश भौमिक (पीबीजी पुणे जॉगर्स) आणि प्रतिक तुलसेनी (मुंबई मोझार्ट), यांची अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष आणि महिला टेबल टेनिसपटू म्हणून निवड करण्यात आली.