For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेची बदनामी; दोघांना अटक 

12:38 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेची बदनामी  दोघांना अटक 
Advertisement
फलटण : सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह व अश्लील फोटो, व्हीडिओ तसेच अश्लील संदेश प्रसारित करून तिची व तिच्या पतीची बदनामी करणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. यामधील एकजण सिमकार्ड विक्रेता आहे. गुन्ह्यात वापरलेले चार मोबाईल व सहा सिमकार्ड असा एकूण २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) व सुनिल बाळू मोहिते (वय ३४, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) अशी प्रमोद कांबळे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड मिळवून इन्स्टाग्रामवर विविध बनावट खाती तयार केली होती.
या खात्यांद्वारे गेल्या सहा महिन्यांपासून पीडित महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व सुनील मोहिते आक्षेपार्ह फोटो, व्हीडिओ आणि संदेश फेसबुक, व्हॉट्सॲप इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रसारित केले जात होते. त्यामुळे पीडित महिला व तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक व बनावट इन्स्टाग्राम आयडींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद कांबळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा सुनिल मोहिते याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तपासात सुनिल मोहिते हा एका मोबाईल कंपनीचा सिमकार्ड विक्रेता असल्याचे समोर आले. त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड उपलब्ध करून दिले होते.
ही सिमकार्ड सक्रिय करून त्यांचा वापर प्रमोद कांबळे याने गुन्हा करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, पोलीस अंमलदार बापूराव धायगुडे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे, निखील गायकवाड, गणेश अवघडे, जयदीप यादव, अतुल बडे यांनी केली.
Advertisement
Advertisement
Tags :

.