For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Phaltan News | अतिक्रमण मोहिमेचा मोठा फटका! फलटणमध्ये काही दुकानदारांना दिला ३ दिवसांचा अल्टिमेटम; वाचा नेमका काय आहे प्रकार

04:06 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
phaltan news   अतिक्रमण मोहिमेचा मोठा फटका  फलटणमध्ये काही दुकानदारांना दिला ३ दिवसांचा अल्टिमेटम  वाचा नेमका काय आहे प्रकार
Advertisement

Advertisement

फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील पालखी मार्गावर पालिकेच्या वतीने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे दरम्यान मलठण, क्रांतिसिंह नाना पाटील चौक व गजानन चौक येथील काही अतिक्रमणे हटविण्यात आली असून ज्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याचे कबूल केले आहे. त्यांना तीन ते चार दिवसांची मुदत दिली आहे.

या मोहिमे निमित्ताने शहरातील पालखी मार्ग जरी मोकळा श्वास घेणार असला तरी या मार्गाचे रस्ता रुंदीकरण व अतिक्रमणाचे मोजमाप यांच्या 'मापामध्ये पाप नको अशा प्रतिक्रिया शहरवासीयांमधून उमटत आहेत.शुक्रवार दि. १७ जुलै रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा प्रारंभ मलठण येथून करण्यात आला. त्याचबरोबर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक व फगजानन चौक या परिसरातहीही मोहीम राबविण्यात आली.

Advertisement

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण शहरातील पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील सुरु आहे. शहरांतर्गत येणारा पालखी मार्ग प्रशस्त होण्याकरितानगरपरिषदेने सुरु केलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत पालखी मार्गावरील टपऱ्या, हातगाडे, मचाने, पत्र्याचे शेड, ओटे, कुंपण आणि विविध स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यातआले. त्याचबरोबर ज्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढण्याची तयारी दर्शविली आहे, त्या अतिक्रमणधारकांना ती काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांची मुदत दिली आहे.

सदर मोहीम अहिल्यादेवी चौक (पृथ्वी चौक), रिंग रोड, डिएड चौक, गिरवी नाका या परिसरात देखील राबविण्यात येणार आहे. तसेच पूर्वी या मोहिमेअंतर्गत शहरातील जी अतिक्रमणे हटविण्यात आली होती, परंतु काही ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणे तयार झाली आहेत त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेला कोणीही विरोध करत नसले तरी आजवरच्या अतिक्रमण हटाव मोहिमांमध्ये हातावरपोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाच मोठी झळ बसली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अतिक्रमण मोहिमेबरोबरच शहरात जी हजारो अनाधिकृत बांधकामे आहेत, त्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे धाडस नगरपरिषद प्रशासन दाखविणार का तसेच पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करताना मापात पाप नको एवढीच अपेक्षा नागरिकांची आहे.

Advertisement
Tags :

.