इंटरनेटशिवाय पीएफ बॅलन्स बघता येणार
नवी दिल्ली :
आता एखाद्या पीएफधारकाला जर ईपीएफओ वेबसाइट किंवा उमंग अॅप चालू नसेल आणि पीएफ बॅलन्स बघायचा असेल, तर पीएफ कर्त्याला मिस्डकॉल किंवा एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्स बघण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. ही सेवा इंटरनेटशिवाय 24 तास आणि 7 ही दिवस काम करते, त्यामुळे काही मिनिटांत संबंधीतांना पीएफ बॅलन्स जाणून घेता येईल. या पद्धतीविषयी जाणून घेऊया.
मिस्ड कॉलवरून
पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल द्या.
कॉल आपोआप कट होईल, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
काही सेकंदात, तुम्हाला तुमच्या मोबाइलवर ईपीएफओकडून एसएमएस येईल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ बॅलन्स आणि शेवटच्या जमा रकमेची माहिती असेल. ही सुविधा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचा मोबाईल नंबर युएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी लिंक केलेला आहे आणि केवायसी पूर्ण झाला आहे.
एसएमएसद्वारे बॅलन्स कसा तपासायचा?
तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून 7738299899 क्रमांकावर एसएमएस पाठवा. स्वरूप: इपीएफओएचओ युएएन लॅन (युएएन) ऐवजी तुमचा 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर एंटर करा, लॅन ऐवजी तुमची भाषा लिहा उदा. हिंदीसाठी HIN, इंग्रजीसाठी ENG).