For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपये

03:04 PM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपये
Advertisement

डिझेल प्रतिलिटर 91.75 रुपयांवर

Advertisement

पणजी : गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेल या इंधनाचे दर अचानक तीन रुपयांनी वाढले असून महागाईने आधीच त्रस्त झालेल्या जनतेला या इंधन दरवाढीचा फटका बसणार आहे. या नवीन दरवाढीचा परिणाम म्हणून गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपये झाले असून डिझेलचे दरही प्रतिलिटर रु. 91.75 इतर झाले आहे. गोव्यात व संपूर्ण देशात ही दरवाढ तातडीने लागू करण्यात आली असून तिची कार्यवाही पेट्रोल पंपवाल्यांनी सुरू केली आहे. आखाती देशात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून ही दरवाढ करण्याची वेळ पेट्रोलियम कंपन्यांवर आली आहे. वाहनचालकांना पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलची दरवाढ सोसावी लागणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.