For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते पेट्रोल

06:22 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
1000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते पेट्रोल
Advertisement

पाकिस्तानी मंत्र्याकडून भीती व्यक्त : सध्या 389 रुपये प्रतिलिटर किंमत

Advertisement

 वृत्तसंस्था, इस्लामाबाद

पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 1000 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचू शकते. देशात पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्यास किमती आणखी वाढू शकतात असा इशारा पेट्रोलियम मंत्री परवेज मलिक यांनी दिला आहे. मलिक यांच्यानुसार पाकिस्तानात पेट्रोल आतापर्यंत सुमारे 50 टक्के महाग झाले आहे. सध्या पेट्रोल 389 पाकिस्तानी रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 424 रुपये प्रतिलिटरमध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

मध्यपूर्वेतील संघर्ष वाढल्याने जगात कच्च्यातेलाच्या किमती वाढत आहेत. 28 फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाले होते, त्यादिवशी पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 258.17 रुपये प्रतिलिटर होती. यात आतापर्यंत 131 रुपयांची वाढ झाली आहे.

दुचाकी अन् छोट्या  वाहनांना अनुदान

वाढत्या किमतीदरम्यान पाकिस्तान सरकारने दुचाकी, रिक्षा आणि 800 सीसीपर्यंतच्या कारसाठी पेट्रोलवर अनुदान योजना सुरू केली आहे. यात पेट्रोलवर 100 रुपये प्रतिलिटरपर्यंतचे अनुदान दिले जातेय.  प्रत्येक पात्र व्यक्तीला महिन्याला 4 टोकन मिळतात, प्रत्येक टोकनवर 500 रुपयांचे अनुमान मिळणार आहे. योजने आता 1 जानेवारी 2006 पासून नोंदणीकृत दुचाकींना सामील करण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारनुसार योजनेत 17.5 लाखाहून अधिक लोकांनी नोंदणी करविली आहे. सुमारे 15 लाख टोकन्स जारी झाल्या असून 6.80 लाखाहून अधिक टोकन्सचा वापर झाला आहे.

बांगलादेशातही संकट

बांगलादेश सरकारने सोमवारपासून इंधनाच्या किमतीत 17.4 टक्क्यांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे बांगलादेशात वाहतूक आणि उत्पादनाचा खर्च वाढणार आहे. याचा प्रभाव पूर्वीपासून महागाई आणि वीज-गॅसच्या टंचाईला तोंड देणारे लोक आणि व्यवसायांवर पडण्याची भीती आहे. बांगलादेशात डिझेलची किंमत 115 वरून वाढत 135 टका प्रतिलिटर झाली आहे. ऑक्टेनची किंमत 145 वरून वाढत 165 टका, पेट्रोल 140 वरून वाढत 160 टका आणि केरोसिन 135 वरून वाढत 155 टका प्रतिलिटरवर पोहोचले आहे.

Advertisement
Tags :

.