कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेट्रोल 40 रुपये, दारुही स्वस्त

06:32 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पेट्रोल आणि दारु, दोन्हीही महाग अशी स्थिती सध्या आपल्याकडे आहे. तथापि, या जगात एक स्थान असे आहे, की जेथे पेट्रोल केवळ 40 रुपये लीटर असून दारुही अतिशय स्वस्त आहे. तसेच खाण्यापिण्याच्या इतर वस्तूही अत्यंत वाजवी दरात मिळतात. इतकेच नव्हे, तर या स्थानी जाण्यासाठी व्हिसा विनामूल्य मिळतो. हे स्थान एक छोटे बेट असून त्याचे नाव लँगकावी असे असून ते मलेशिया या देशात आहे. हे एक पर्यटनस्थळ म्हणून विकसीत झाले आहे.

Advertisement

Advertisement

येथे जाण्यासाठी आपल्याला विनामूल्य व्हिसा मिळू शकतो. येथे अतियश कमी दरात हॉटेलांमध्ये वास्तव्य करता येते. हॉटेलाचा वास्तव्य दर दोन रात्रींसाठी 2 हजार ते 5 हजार रुपये इतका आहे. खाण्यापिण्याचा खर्चही दिवसाला 600 रुपये ते 1 हजार रुपये इतकाच आहे. या बेटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तसेच फिरणे, भटकंती करणे इत्यादींसाठी सोय आहे. त्यांचा खर्चही दिवसाला 500 रुपयांच्यावर येत नाही. या बेटावर प्रत्येक वस्तू पर्यटकांना करमुक्त मिळते. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर स्वस्त आहे. येथे शाकाहारही अतिशय स्वस्त मिळतो. त्यामुळे आपण शाकाहारी असला किंवा मांसाहारी असला तरी आपली कोणतीही गैरसोय होत नाही. चविष्ट शाकाहारी जेवण तर येथे केवळ 200 रुपये ते 300 रुपयांना मिळते. पिणाऱ्यांची तर येथे मजाच असते.

इतकेच नव्हे, तर हे स्थान इतर पर्यटन स्थळांसारखे गजबजलेले नसते. येथे वन्य जीवनही विपुल असून पर्यटकांना त्याचा आनंद घेता येतो. इतक्या सोयी आणि त्याही स्वस्त असूनही येथे पर्यटकांची गर्दी उसळलेली नसल्याने या स्थळाचा आनंद अधिक प्रमाणात घेता येतो, असे येथे जाऊन आलेल्यांचे म्हणणे आहे. मलेशिया सरकारनेही या स्थानाचे हे महत्व चांगल्या प्रकारे जपल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article