महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पेट्रोल 1 रुपयाने, तर डिझेल 36 पैशांनी महागले

01:17 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 1 रुपयाने तर डिझेल 36 पैशांनी वाढले आहे. नवीन दर आज शनिवार 22 पासून लागू होणार आहेत. पणजीत सध्या पेट्रोलचा दर 95.23 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 87.79 रुपये प्रति लिटर आहे, असे एका पेट्रोल पंप मालकाने सांगितले. आज शनिवारपासून पेट्रोल 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.15 रुपये प्रति लिटर होणार आहे. पणजी, मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे किमती किंचित बदलतात, मात्र नवीन दराबाबत विस्तृत माहिती आम्हाला अजून मिळायची आहे, असे ते म्हणाले. दरवाढीचे वृत्त पसरताच पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या. वित्त खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलसाठी आता व्हॅट वाढवून 21.5 टक्के तर डिझेलवरील व्हॅट वाढवून 17.5 टक्के करण्यात आला आहे. या दरवाढीसाठी 2005 च्या गोवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) कायद्याच्या परिशिष्टात दुऊस्ती करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article