For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोलची शंभरी पार, डिझेल रु.92.17

05:17 PM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोलची शंभरी पार  डिझेल रु 92 17
Advertisement

पणजी : गोवा राज्यात पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केली असून आता तो दर रु. 100.40 एवढा झाला आहे. डिझेलचा प्रति लिटर दर रु. 92.17 पर्यंत पोहोचला असून उच्च प्रतीचे स्पीड पेट्रोल प्रति लिटर रु. 109.29 झाले आहे. पेट्रोल-डिझेल दरात एकूण 90 पैशांनी वाढ झाल्यानंतर गोव्यातील दर वरीलप्रमाणे असून ते लागू झाले आहेत. एका आठवड्यापूर्वी दोन्ही इंधनांचे दर प्रति लिटर रु. 3 ने वाढले होते व आताची वाढ जमेस धरुन एकूण रु. 3.90 या दराने इंधन वाढले आहे. ही दरवाढ झाली असली तरी इतर राज्ये आणि शहरे यांच्या तुलनेत गोव्यातील पेट्रोल - डिझेल इंधनाचे दर कमीच आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर रु. 106.98, पुण्यात रु. 107.60, बेंगळूरमध्ये रु. 107.10 तर हैदराबाद येथे रु. 110.89 असे दर आहेत. इतर राज्ये व शहरात डिझेलचे दर प्रति लिटर रु. 95 च्या आसपास असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

Advertisement

.