सिंधुदुर्गाला होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा गोवा ऑइल डेपोतून करावा
सिंधुदुर्ग पेट्रोल पंप डीलर असोशिएशन अध्यक्ष आणि पेट्रोल पंपधारकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कुडाळ / प्रतिनिधी
गगनबावडा घाट वाहतुकीस चालू होईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा वास्को गोवा येथील ऑइल डेपो मधून करण्या संदर्भात तिन्ही पेट्रोलियम कंपन्या (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम) यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी व पेट्रोल डिझेल पुरवठा वास्को डेपोतून करावा अशी मागणी सिंधुदुर्ग पेट्रोल पंप डीलर असोशिएशन अध्यक्ष शेखर सावंत व पेट्रोल डिझेल पंप धारकांनी सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
सिंधुदर्ग जिल्ह्याला होणाऱ्या पेट्रोल डिझेल टँकरच्या वाहतुकी संदर्भात घाट मार्ग दुरुस्ती सुरू असल्याने प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंप धारक मालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले कि आमचे पेट्रोलियम टँकर हे मिरज येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची वाहतूक करतात, सध्यस्थितीत गगनबावडा घाट दुरुस्तीसाठी व आंबोली घाट हा अवजड वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे जिल्ह्यातून व गोवा राज्यातून पुणे, कोल्हापूरला जाणारी सर्व अवजड वाहनांची वाहतूक ही फोंडा -राधानगरी घाट रस्त्याने होते.
राधानगरी घाट हा अतिशय अरुंद असून त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. व ह्या घाटातील वाहतूक खोळंबत असते. ४ डिसेंबर रोजी ह्या घाटात पोकळे पेट्रोलियमचा टँकर अपघात ग्रस्त झाला. व आग लागून पूर्णतः जळून खाक झाला. तसेच या अपघातातील ट्रॅकर चालक ट्रकरला अपघाता नंतर लागलेल्या आगीत होरपळून जागीच मयत झाला तरी आपण यांची दखल घेऊन गगनबावडा घाट वाहतुकीस चालू होई पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणारी पेट्रोल डिझेल चा पुरवठा वास्को गोवा येथील ऑइल डेपो मधून करण्या संदर्भात तिन्ही पेट्रोलियम कंपन्या (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम) यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी व तसा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे चर्चा करून निवेदन सादर केले या वेळी सिंधुदुर्ग पेट्रोल डीलर असोसिएशन अध्यक्ष शेखर सावंत, सेक्रेटरी रोहन देसाई, तालुका प्रमुख ओंकार देसाई, रवी मालवाणकर, संजय देसाई, सदानंद देवळी, शुभम पालव, हर्षल लोट, उपस्थित होते.