For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गीतील जमीन वादासंबंधी पोलीस आयुक्तांना निवेदन

12:47 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गीतील जमीन वादासंबंधी पोलीस आयुक्तांना निवेदन
Advertisement

बेळगाव : कणबर्गी येथील एका जमीन वादासंबंधी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. तेथील सात शेतकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. कणबर्गी येथील 1 एकर 26 गुंठे व 39 गुंठे या दोन जमिनीसंबंधी न्यायालयाने तेरा जणांची नावे दाखल करण्यासंबंधी आदेश दिला आहे. मात्र, आपल्याला फसवून केवळ पाच जणांची नावे लावण्यात आली आहेत. आता या जमिनीची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जमिनीत गेल्यावर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे, अशी तक्रार श्रीकांत मालाई, नागेश मालाई यांच्यासह सात शेतकऱ्यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.