For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'कदंब'तील नोकरभरतीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

11:03 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
 कदंब तील नोकरभरतीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका
Advertisement

पणजी : सरकारच्या कदंब परिवहन महामंडळामध्ये साहाय्यक अधीक्षक पदाच्या भरतीसाठी अर्ज करूनही संधी नाकारल्याबद्दल एका उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. कदंब महामंडळाने १२ जुलै २०२२ रोजी विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यातील साहाय्यक अधीक्षक पदासाठी प्रजय नाईक यानेही अर्ज केला होता. मात्र महामंडळाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने माहिती हक्क कायद्याखाली विचारणा केली असता, त्याला धक्काच बसला. त्याने जन्म दाखला सादर केला नव्हता, तसेच त्याचा अनुभवाचा कालावधी शिक्षणाशी जुळत नव्हता, अशी कारणे देऊन त्याचा अर्ज फेटाळला गेला असल्याचे उत्तर त्याला मिळाले.

Advertisement

न्यायालयाने मागविला खुलासा
सदर उमेदवाराने जन्म दाखला व अनुभव प्रमाणपत्र सादर केले होते, तरीही त्याचा उल्लेख झाला नव्हता. त्यासंबंधी चौकशी केली असता, त्याच्या कागदपत्रातून जन्म दाखला गायब झाला असल्याचे उघड झाले. अर्जासोबत सदर दोन्ही कागदपत्रे जोडली होती याची पडताळणी व पूर्ण खात्री केल्यानंतरच संबंधित क्लार्कने अर्ज स्वीकारला होता. तरीही आपणावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाईक याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती न्यायालयाने स्वीकारली असून प्रतिवादी कदंब महामंडळाकडून खुलासाही मागविण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.