For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात भात-ऊस पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

11:27 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात भात ऊस पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यात यंदा भात लागवड 31,230 हेक्टर तर ऊस लागवड 18,160 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. यावर्षी 2025-26 च्या मान्सून हंगामात समाधानकारक पावसामुळे खानापूर तालुक्यातील मुख्य पिके भात व ऊस उत्तम वाढीच्या अवस्थेत आली आहेत. मात्र सततचा पाऊस, उष्ण वातावरण व दमट हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार भात पिकात ब्राऊन प्लांट हॉपर (बीपीएच) व बॅक्टेरियल ब्लाइट तर उसात पांढरी लोकरी (मावा) गंभीर स्वरूपात दिसून येत आहे.

Advertisement

यासाठी उपाययोजना म्हणून भात पिकासाठी ब्राऊन प्लांट हॉपरवर नियंत्रणासाठी ट्रायफ्लुमेझोपायरिन 10 एससी 0.5 मिली/लिटर किंवा फ्लोनिकामिड 50 डब्ल्यूजी 0.3 ग्रॅम/लिटर आणि बॅक्टेरियल ब्लाइटसाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम/लिटर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 0.25 ग्रॅम/लिटर वापर करावा. तसेच उसासाठी पांढरी लोकरी (मावा) नियंत्रणासाठी थायामेथोक्सम 75 एसजी 0.3 ग्रॅम/लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल 0.4 मिली/लिटर घालून नियंत्रणात आणावे. शेतकऱ्यांनी या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन कृषी खात्याचे साहाय्यक निर्देशक सतीश माविनकोप यांनी  केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संपर्क केंद्राशी संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
Tags :

.