For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; सतर्कतेचा इशारा

12:17 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव  सतर्कतेचा इशारा
Advertisement

सौंदत्ती, यरगट्टी तालुक्मयातील सोयाबीन, मूग, उडीद पिकांना फटका

Advertisement

बेळगाव : सौंदत्ती व यरगट्टी तालुक्मयांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत सुमारे 6,742 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 10,128 हेक्टर क्षेत्रावर मूग व 4,463 हेक्टर क्षेत्रावर उडीद पेरणी करण्यात आली आहे. सध्या ही पिके 15 ते 20 दिवसांची झाली असून, दोन्ही तालुक्मयांतील विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या सर्वेक्षण पथकाने बुधवारी भेट देऊन किडी व रोगांचा आढावा घेतला. या पथकात उप कृषी संचालक सलीम संगत्रास, मत्तिकोप्प येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, साहाय्यक कृषी संचालक सी. आय. हुगार, सौंदत्तीचे साहाय्यक कृषी संचालक शिवप्रकाश पाटील यांच्यासह कृषी अधिकारी सहभागी होते. सर्वेक्षणादरम्यान सोयाबीन पिकामध्ये काही ठिकाणी खोड पोखरणारी अळी (स्टेम बोरर) व हिरवी शेंग पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा) यांचा प्रादुर्भाव आढळून आला. या किटकांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

औषध फवारणी करण्याचा सल्ला

Advertisement

हेलिकोव्हर्पा नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5 टक्के एससी हे औषध 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत 13:0:45 हे पाण्यात विरघळणारे खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळावे. तसेच प्रति एकर 5 ते 8 हेलिल्युअर सापळे लावावेत. खोड पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी थायामेथॉक्सॅम 12.6 टक्के आणि लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के मिश्रित औषध 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीचा सल्ला दिला आहे.

स्क्लेरोशियम खोडकूजचा प्रादुर्भाव

काही भागांत स्क्लेरोशियम खोडकूज रोगाचाही प्रादुर्भाव दिसून आला. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बोक्सिन 37.5 टक्के आणि थायरम 37.5 टक्के (व्हिटाव्हॅक्स पावडर) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या सभोवतालची माती औषधाने भिजवावी. याशिवाय उडीद व मूग पिकांमध्ये पांढरी माशी (व्हाईट फ्लाय) किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास एसीटामिप्रिड 20 टक्के एसपी 2 ग्रॅम व 19:19:19 हे पाण्यात विरघळणारे खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

औषध फवारणी करताना काळजी घेण्याचे आवाहन

मूग पिकात काही ठिकाणी पिवळा विषाणूजन्य रोग (यलो मोजॅक) तसेच पान गुंडाळी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या रोगांच्या नियंत्रणासाठी अफिडोपायरोपेन 5 टक्के डीसी 1.5 ते 2 मिली व 19:19:19 हे खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. औषध फवारणी करताना शेतकऱ्यांनी आवश्यक सुरक्षात्मक उपायांचे पालन करावे. तसेच वाऱ्याच्या विऊद्ध दिशेने फवारणी टाळावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Advertisement
Tags :

.