Miraj Crime | मिरज तालुक्यात विकृती! निष्पाप बालकाला गोड बोलून घरी नेले अन्...;
गोड बोलून घरी नेले आणि दाखवला अश्लील व्हिडिओ;
सांगली : आठ वर्षीय बालकालागोड बोलून आपल्या घरी नेऊन मोबाईलवर अश्लील व्हिडिओ चित्रण त्याला बघण्यास भाग पाडून त्याच्याशी चाळे करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित वैभव उर्फ यश सुभाष सूर्यवंशी (रा. जुनी धामणी, ता. मिरज) याच्या विरोधात सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.
पोलिसांकडूनमिळालेल्यामाहितीनुसार, पीडित बालकाच्या पालकांनी सांगली ग्रामीण पोलिसात धाव घेऊन आपल्या मुलाच्या बाबतीत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. संशयित वैभव सूर्यवंशी याने गोड बोलून त्या बालकाला आपल्या घराकडे नेले.
त्या ठिकाणी मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्या पीडित बालकाबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न संशियीताने केला आहे, अशी फिर्याद बालकाच्या पालकांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत.