For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : मुक्कामी एसटी बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या; मसले चौधरी येथील घटना

07:03 PM Oct 31, 2023 IST | Abhijeet Khandekar
solapur   मुक्कामी एसटी बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या  मसले चौधरी येथील घटना
ST bus Masle Chaudhary
Advertisement

मोहोळ : प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे मुक्कामी असणाऱ्या एसटी बसच्या चालकास गाडीच्या खाली उतरवून मागील व पुढील काचा ४० ते ५० अज्ञाताने फोडल्याची घटना दि.३० रोजी मसलेचौधरी येथे रात्री ८:४५ वाजनेच्या सुमारास घडली.

Advertisement

या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण तुकाराम रणदिवे रा.कामती बु || ता.मोहोळ हे राज्य परिवहन महामंडळात एसटी चालक म्हणून नोकरी करीत आहेत.दि.३० रोजी एसटी बस क्रमांक एम एच १४ / बी टी ३४२७ ही बस मसलेचौधरी येथे मुक्कामी घेऊन गेले होते.रात्री ८:४५ वाजनेच्या सुमारास मसले चौधरी येथे बस पोहचल्यानंतर अचानक ४० ते ५० अज्ञात लोकांनी एसटी बसला थांबून चालक नारायण रणदिवे यांना दमदाटी करून तुम्ही गाडीच्या खाली उतरा असे म्हणत दगडाने एसटीच्या पुढील व पाठीमागील काचा तसेच खिडकीच्या काचा फोडून एसटी चे साधारणपणे ५० हजारांचे नुकसान केले. व तसेच एसटीचे टायरची हवा सोडण्याचा प्रयत्न केला.असे नारायण रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.