सोमवंशी समिती अहवाल संपूर्ण राज्याला लागू हे पर्ससीनधारकांना दाखवून देऊ !
12:40 PM Nov 07, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
बारा सागरी मैलाच्या आतील पर्ससीन नौका किनाऱ्यावरून दिसतात
Advertisement
मालवण -:
Advertisement
बारा सागरी मैलापलीकडील पर्ससीन नौका किनाऱ्यावरून दिसत नाहीत. नियम डावलून साडेबारा वावाच्या आत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौका मात्र, किनाऱ्यावरून दिसतात. अशा पर्ससीन नौकांमुळेच वारंवार संघर्ष उफाळून येतोय. पण काही पर्ससीनधारक राष्ट्रीय हद्दीची सबब,पुढे करून स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांचे हे मनसुबे आम्ही सफल होऊ देणार नाही. सोमवंशी समिती अहवाल संपूर्ण राज्याला लागू आहे हे दाखवून देऊ. जोपर्यंत सोमवंशी अहवालाची राज्यात सर्वत्र काटेकोरपणे अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत शासन आणि मत्स्य अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दांडी येथील पत्रकार परिषदेत दिला.
Advertisement
Next Article