For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेरी एडवर्ड्सचा एलेक्ससोबत विवाह

06:40 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेरी एडवर्ड्सचा एलेक्ससोबत विवाह
Advertisement

10 वर्षे एकत्र राहिल्यावर घेतला निर्णय

Advertisement

गायिका पेरी एडवर्ड्स आणि तिचा फुटबॉलर प्रियकर एलेक्स ऑक्सलेड-चेम्बरलेन यांनी जवळपास एक दशकापर्यंत एकत्र राहिल्यावर पोर्तुगालमध्ये विवाह केला आहे. हा विवाह सोहळा फारोमध्ये पार पडला असून यात परिवार अन् जवळचे मित्र सामील झाले. या जोडप्याला एलैनिस वॅलेंटाइन ही मुलगी तर एक्सल हा मुलगा आहे.

एडवर्ड्सने फुलांचे डिझाइन असलेले पांढरा वेडिंग गाउन परिधान केला होता. तर ऑक्सलेड-चेम्बरलेनने क्लासिक काळ्या रंगाचा टक्सीडो परिधान केला होता. या सोहळ्यात जवळपास 70 निकटवीर्तय आणि परिवाराचे सदस्य सामील झाले. या जोडप्याने अल्गार्वे भागात स्वत:च्या विलानजीक विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. पाहुण्यांना त्यांच्या हॉटेलमधून सोहळ्याच्या एका ठिकाणी नेण्यात आले आणि त्यानंतर ‘पारिला नॅचरल“मध्ये रिसेप्शन पार पडले.

Advertisement

विवाह सोहळ्यात सामील सेलेब्रिटीजमध्ये एडवर्ड्सच्या ‘लिटिल मिक्स“ बँडमधील सहकारी ली-ऐन पिनॉकचा समावेश होता. तर ऑक्सलेड-चेम्बरलेनचे अनेक सहकारी फूटबॉलपटू यावेळी उपस्थित होते. एडवर्ड्स आणि ऑक्सलेड-चेम्बरलेन 2017 पासून एकत्र आहेत.

Advertisement
Tags :

.