For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक नेमण्याची मागणी

01:16 PM Aug 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक नेमण्याची मागणी
Advertisement

पेडणे : पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये कथित आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सुदीप नारायण ताम्हणकर यांनी सहकार मंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे.

Advertisement

सोसायटीच्या कारभाराची चौकशी करून संबंधित गैरव्यवहारांची सत्यता समोर आणावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी ताम्हणकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांसह अन्य प्रशासकीय बाबींचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा ताम्हणकर यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.