महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात 70 ठिकाणीच फलक उभारण्याचा परवाना

12:33 PM Jan 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शहरातील ए, बी, सी, डी, ई या पाच वॉर्डात मिळून म्हणजे संपूर्ण शहरात विशिष्ट 70 ठिकाणीच तात्पुरत्या स्वरूपात आणि परवानगी घेऊनच डिजिटल फलक लावण्याचा नियम आहे. तोही न्यायालयाने दिलेल्या एका निर्देशानुसार आहे . पण वास्तव हे आहे की शहरात आज या मितीस 700 हून अधिक डिजिटल फलक ठिकठिकाणी झळकत आहेत. त्यात ठराविक नेतेमंडळी व कायम प्रकाशझोतात राहण्याची चटक लागलेले कार्यकर्ते आजी-माजी पदाधिकारी आहेत. सारे शहर त्यांनी विद्रूप केले आहे .

Advertisement

या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजकीय पक्ष संघटना यांना पत्राद्वारे डिजिटल फलक लावायची आचारसंहिताच पाठवली आहे. निर्देश दिलेल्या 70 ठिकाणापेक्षा अन्य जागावर डिजिटल फलक लावले तर कारवाई काय स्वरूपाची असेल याचीही माहिती दिली आहे. पण हे सारे नियम कागदावर राहिले आहेत. आणि तेच ते चेहरे डिजिटल फलकावर बिनधास्त झळकले आहेत.

कोल्हापुरात वाढदिवसाच्या फलकांची संख्या सर्वाधिक आहे. आता तर महापालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी वाढदिवसाची संधी घेत डिजिटल फलक लावले आहेत. आणि विशेष हे की त्यांनी स्वत:च्या खर्चानेच हे फलक लावले आहेत. त्याखाली मित्रांची नातेवाईकांची मंडळांची नावे शुभेच्छक म्हणून घातली आहेत. फलकावर विशेषणांचा पाऊस आहे. स्वत:ची आरती स्वत: स्वखर्चाने ओवाळून घेण्याचा हा प्रकार प्रत्येक प्रभागात आहे. कोल्हापुरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक गुंडा रजिस्टर असते त्यात गुन्हेगारांचे फोटो हाताचे ठसे असतात. ते जामिनावर बाहेर आहेत. पण त्यातले काहीजण कायम अशा फलकावर झळकत आहेत. त्यांची कमी अधिक दहशत प्रभागात, शहरात आहे. पण रोज उठून कोणत्या ना कोणत्या चौकात गल्लीत त्यांचा झळकलेला फोटो कोल्हापूरकरांना पहावाच लागतो आहे असे बहुतेक फोटो गॉगल गळ्यात साखळ्या, चट्ट्यापट्टयाचा भडक शर्ट अशा ठराविक पेहरावातील आहेत. कोल्हापुरात अशा फलकांनी अतिरेक केला आहे.

पुरातत्त्वच्या यादीतील मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या मंदिराच्या भिंतीवर आपले डिजिटल लावण्याचे धाडस वाढदिवसाच्या निमित्ताने काही जणांना आले आहे. कोणाच्याही दारात रात्री तसे फलक उभे केले जातात. त्याला तेथील रहिवासी आक्षेप घेऊ शकत नाहीत. कारण संबंधिताचे त्या भागात वजन असते. आणि कोणी आक्षेप घेत नाही. म्हटल्यावर डिजिटल फलक लावणाऱ्याचे धाडस अधिकच वाढत जाते. रंकाळा चौपाटी सारखा सुंदर दगडी बांधणीचा परिसर त्यामुळेच या फलकामागे दडून गेला होता अशी परिस्थिती आहे .

                                            मुद्दाम राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे...
बेकायदेशीर फलकावर मुद्दाम राष्ट्रपुरुष राष्ट्रीय राज्य पातळीवर व्यक्ती
, नेते यांची छायाचित्रे लावण्याची सोयीची पद्धत आहे. जेणेकरून फलक काढायला कोणी आले तर राष्ट्रपुरुषाची अवहेलना, विटंबना अशी तक्रार त्यांना करता येते व कारवाईला वेगळे वळण देता येते. आणि अतिक्रमण निर्मूलन पथक अशा नको त्या परिणामांनाच दबकते व सावध पवित्रा घेते.

                            70 ठिकाणीच तात्पुरते डिजिटल फलक लावण्याची परवानगी
या परिस्थितीबद्दल अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख विलास साळोखे यांच्याशी संपर्क साधला असता शहरात ज्या
70 ठिकाणी काही निमित्ताने तात्पुरते डिजिटल फलक लावण्याची परवानगी आहे त्याची यादी तयार आहे. तेथेच पूर्वपरवानगीने डिजिटल फलक उभे करता येतात तशी पत्रे राजकीय पक्ष व संघटनांना दिली आहेत. आमचे पथक अनाधिकृत फलकावर लक्ष ठेवू नये असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article