महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

यापुढे बिअर बार, वाईन शॉपना परवानगी आवश्यक

10:44 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महसूल वाढीसाठी कॅन्टोन्मेंट लावणार कर : निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करणार

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये सुरू असलेले बिअर बार व वाईन शॉप हे कॅन्टोन्मेंटच्या परवानगीविना सुरू आहेत. त्यामुळे यापुढील काळात बिअर बार व वाईन शॉपला जेसीओ तसेच कॅन्टोन्मेंटची परवानगी तर घ्यावी लागणारच आहे. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डला कर देखील भरावा लागणार आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Advertisement

कॅम्प तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक वाईन शॉप तसेच बिअर बार आहेत. बिअर बार सुरू करताना त्यांनी राज्य सरकारच्या अबकारी खात्याकडून परवाना घेतला आहे. परंतु, संरक्षण मंत्रालयाच्या नियमावलीनुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच जेसीओंची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मागील अनेक वर्षांपासून कॅन्टोन्मेंटची परवानगी न घेताच बिअर बार व वाईन शॉप सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बोर्ड मिटिंगमध्ये या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाईन शॉप तसेच बिअर बारमधून मोठ्या प्रमाणात गल्ला जमा होत असला तरी त्याचा फायदा कॅन्टोन्मेंटला होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बिअर बारचालकांना यापुढे जेसीओ तसेच कॅन्टोन्मेंटची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला एक निश्चित कर कॅन्टोन्मेंटला भरावा लागणार असल्याचे सीईओंनी बैठकीमध्ये स्पष्ट केले होते.

आता विविध प्रश्न उपस्थित?

मागील वर्षानुवर्षे कॅन्टोन्मेंट परिसरात वाईन शॉप व बिअर बार सुरू आहेत. राज्य सरकारच्या अबकारी खात्याने परवानगी दिला असली तरी वाईन शॉप सुरू करताना कॅन्टोन्मेंटची परवानगी का घेतली गेली नाही? इतके दिवस कॅन्टोन्मेंटच्या कोणत्याच अधिकाऱ्याने कारवाई का केली नाही? की जाणीवपूर्वक कारवाई

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article