For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी राजकीय दबावामुळे नाकारली

11:13 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी राजकीय दबावामुळे नाकारली
Advertisement

प्रकरणाच्या चौकशीची भारत मुक्ती मोर्चाची मागणी

Advertisement

बेळगाव : भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द करण्यात आल्याने भारत मुक्ती मोर्चा बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या लोकांनी या कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. भारत मुक्ती मोर्चाचे 42 वे अधिवेशन 26 ते 30 डिसेंबर 2025 रोजी ओडिसा येथे होणार होते. परंतु राजकीय हस्तक्षेप करत अधिवेशनाची परवानगी रद्द करण्यात आली. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी हे अधिवेशन होणार होते. यामुळे ओडिसा सरकारकडून संविधानाचे उल्लंघन करण्यात आल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.  यावेळी काशीराम चव्हाण, फकिरप्पा तलवार, विठ्ठल पोळ, वीरुपाक्षी मेत्री, विठ्ठल रनखांबे यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.