कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विशाळगडावर होणाऱ्या ऊरूसाची परवानगी पोलिसांनी आणि प्रशासनानं नाकारली

12:16 PM Jan 11, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

जोपर्यंत अतिक्रमण संदर्भातली कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावरती कोणतेही सण उत्सव करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. विशाळगडावर  होणाऱ्या ऊरूसाची पोलिसांनी आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. उद्या दि. १२ रोजी विशाळगडावर ऊरुस होणार होता. ऊरुसासंदर्भात मंत्री नितेश राणे यांनीही वक्तव्य केलं होतं.

Advertisement

काही संघटनांनी प्रशासनाच्या कारवाईच्या आधीच तोडफोड आणि जाळपोळ केली होती. १४ जुलै २०२४ मध्ये यावरून दंगलीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर विशाळगडावर पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती.  आतापर्यंत विशाळगडावरील रहिवासींचे पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारापासून वंचित राहिले होते. काही दिवसांपूर्वी येथील रहिवासींनी मुख्यमंत्र्याकडे विशाळगडावरील पर्यटन सुरू करावे, यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार अटी व शर्ती लागू करून विशाळगडावरील पर्यटन सुरू केले होते. दरम्यान उद्या दि. १२ जानेवारी रोजी विशाळगडावर ऊरूस साजरा करण्यात येणार होता. याविषयी  नितेश राणे यांनी सांगली येथे वक्तव्यही केले होते. दरम्यान आता पोलिसांनी व प्रशासनाने विशाळगडावर कोणताही सण उत्सव साजरा करण्यासाठी मनाई केली असून. उद्या होणाऱ्या ऊरूसाला परवानगी नाकारली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article