For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी फिजीशीयन रूजू

03:33 PM Apr 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी फिजीशीयन रूजू
Advertisement

विविध सामाजिक संघटनांच्या मागणीला यश

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

गेली ५ वर्ष सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ फिजीशीयन मिळावा म्हणून सामाजिक संघटनांनी आंदोलन, उपोषणासह सर्व मार्ग अवलंबले होते. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली असून सावंतवाडीला कायमस्वरूपी फिजीशीयन मिळाला आहे. यासाठी रूग्णकल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. फिजीशीयन नसल्याने सावंतवाडीकरांचे हाल होत होते. सामाजिक संघटनांकडून यासाठी अनेक आंदोलने, उपोषण देखील करण्यात आली होती. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची देखील यासाठी भेट घेतली होती. विविध सामाजिक संघटनांकडूनही यासाठी लढा दिला गेला होता. अखेर या लढ्याला यश आले असून डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी हे उपजिल्हा रुग्णालयात रूजू झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. फिजीशीयन नसल्याने अनेक रुग्णांना उपचारा अभावी प्राण गमवावे लागले होते. तर काहींनी गोवा बांबोळीसह इतर पर्याय शोधावे लागत होते.‌ मात्र, आता फिजीशीयन मिळाल्याने यात दिलासा मिळणार आहे. मोड्यूलर आयसीयू विभाग देखील सक्षमपणे चालणार असून मोठ्या शस्त्रक्रिया देखील करता येणार आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून यासाठी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐळवे यांच्या उपस्थितीत फिजीशीयन डॉ. विशाल रेड्डी यांचे स्वागत सावंतवाडीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, युवा रक्तदाता संघटनेचे प्रथमेश प्रभू, वसंत सावंत, मंदार सावंत आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.