2026 मध्ये ओटीटीवर येणार पीरियड ड्रामा
प्राइम व्हिडिओची बहुप्रतीक्षित वेबसीरिज ‘द रेवोल्यूशनरीज’ची पहिली झलक अखेर समोर आली आहे. यात भुवन बामपासून रोहित सराफ, प्रतिभा रांटा, गुरतफेह पीरजादा आणि जेसन शाह असे कलाकार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले आहे. तर निर्मिती मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानीकडून एम्मे एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. ही सीरिज संजीव सान्याल यांचे पुस्तक ‘रिव्होल्युशनरीज : द अदर स्टोरी ऑफ हाउ इंडिया वॉन इट्स फ्रीडम’वर आधारित आहे. या शोचा प्रीमियर 2026 मध्ये प्राइम व्हिडिओवर केला जाणार आहे.
या आगामी पीरियड ड्रामाचा फर्स्ट लुक व्हिडिओ 56 सेकंदांचा आहे. ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी सशस्त्र संघर्ष केवळ आवश्यक नव्हे तर अनिवार्य होता, असे मानणाऱ्या शूर युवा भारतीय क्रांतिकारकांची ही कहाणी आहे. या क्रांतिकारकांचे असाधारण जीवन, बलिदान आणि देशाबद्दल अतूट प्रेमाला एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारा हा शो आहे. ही सीरिज सध्या देशातील विविध शहरांमध्ये चित्रित केली जात आहे. यात मुंबई, अमृतसर, देहरादून, वाराणसीसह अनेक शहरांचा समावेश आहे. माझ्यासाठी द रेवोल्युशनरीज एक ज्ञानाने भरलेला अनुभव आहे. संजीव सान्यालच्या प्रभावी पुस्तकाने आम्हाला या असाधारण युवा देशभक्तांच्या कहाण्यांना सादर करण्यासाठी सशक्त आधार दिला. आम्ही एक उत्तम टीम आणि कलाकारांना एकत्र आणले आहे. हे कलाकार या कहाणीच्या भावनेत पूर्णपणे रमून जाणे आणि या ऐतिहासिक पात्रांना जिवंत करण्यासाठी तयार आहेत, असे निखिल अडवाणीने म्हटले आहे.