For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारवर जनतेचा विश्वास : पंतप्रधान मोदी

06:42 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
सरकारवर जनतेचा विश्वास   पंतप्रधान मोदी
Advertisement

नमो ड्रोन दीदी कार्यक्रमाचा शुभारंभ : आमचे सरकार सेवाभावाने काम करणारे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी महिला शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात महिला किसान ड्रोन केंद्राचे उद्घाटन केले आहे. तसेच देवघर एम्समध्ये 10 हजाराव्या औषधी केंद्राचे उद्घाटन त्यांनी केले आहे. केंद्र सरकार महिला सहाय्य गटांना 15 हजार ड्रोन पुरविणार आहे. याचबरोबर मोदींनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थींशी संवाद साधला ओ. पंतप्रधान मोदींनी जनऔषधी केंद्रांची संख्या 25 हजारांवर नेण्याच्या योजनेचाही शुभारंभ केला आहे.

Advertisement

पूर्वीच्या सरकारांकडून भेदभाव केला जात होता. परंतु आम्ही सत्ताभावाने नव्हे तर सेवाभावाने काम करतो. सर्व योजनांना लोकांपर्यंत पोहोचविणे आमचे काम आहे. पूर्वीचे सरकार स्वत:ला जनतेचे मायबाप समजत होते. सध्या जगात भारताचीच चर्चा होत आहे. भारत  प्रगतीपथावर असून आता थांबणार नाही. जनतेला भारत सरकारवर भरवसा आहे. पूर्वीच्या सरकारांच्या काळात जनता निराश झाली होती. पूर्वीच्या सरकारांकडून प्रत्येक कामात केवळ राजकारण पाहिले जात होती असे मोदींनी म्हटले आहे.

व्हर्च्युअल कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या राज्यांच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी योजनांशी निगडित लाभांबद्दल चर्चा केली आहे. स्वस्त दरात चांगली औषधे उपब्ध करविण्याचा संल्कप आहे. विकसित भारत संकल्प यात्रा पंतप्रधान मोदीची गॅरंटी आहे. संकल्प यात्रेत महिलांची भागीदारी महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

ड्रोन संचालनासाठी प्रशिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आल्यावर योजनेसंबंधी अनेक लोकांनी संशय व्यक्त केला होता. परंतु रमन अम्मा यांच्यासारख्या महिलांनी ड्रोन कृषीमध्ये तंत्रज्ञानाच्या पुढे जात महिला सशक्तीकरणाचे देखील एक प्रतीक ठरणार असल्याचे सिद्ध केले आहे. या सर्व महिला पूर्ण देशासाठी प्रेरण आहेत. विकसित भारताच्या या संकल्प यात्रेत या महिलांची भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

लाल किल्ल्यावरून देशातील ग्रामीण भगिनींना ‘ड्रोन दीदी’ करण्याची घोषणा केली होती. अत्यंत कमी कालावधीत गावांमधील हजारो भगिनींनी ड्रोन चालविणे शिकल्याचे मी पाहिले आहे. माझ्यासाठी तर या ड्रोन दीदीला नमन करण्याचा हा कार्यक्रम आहे. याचमुळे या कार्यक्रमाला मी ‘नमो ड्रोन दीदी’ नाव देत असल्याचे मोदी म्हणाले.

चांगली औषधे आणि स्वस्त औषधे ही मोठी सेवा आहे. यामुळे जितके लोक माझे बोलणे ऐकत आहेत, त्यांनी जनौषधी केंद्रांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी अशी माझी विनंती आहे. पूर्वी औषधांवरील जो खर्च 12-13 हजारांचा असायचा, तो जनौषधी केंद्रांमुळे केवळ 2-3 हजारांवर आला आहे, म्हणजेच लोकांचे 10 हजार रुपये वाचत आहेत असे मोदींनी कार्यक्रमाला उपस्थित लोकांना उद्देशून म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.