निळ्या रंगाचे डोळे असणारे लोक
यो यो हनी सिंहचे गाणे ‘ब्ल्यू आइज’ ऐकले असेलच. लोकांमध्ये निळ्या डोळ्यांवरून एक वेगळीच रुची असते. अनेक दिग्गजांचे डोळे निळ्या रंगाचे असल्याचे माहिती असेलच. हा रंग अत्यंत दुर्लभ आहे आणि तुम्ही फारच कमी लोकांना निळ्या रंगाच्या डोळ्यांसोबत पाहिले असेल. परंतु जगात एक असे गाव आहे, जेथे प्रत्येकाच्या डोळ्याचा रंग निळाच आहे. बाहेरील लोक या गावात पोहोचल्यावर प्रथम घाबरूनच जातात.
हे लोक प्रत्यक्षात बुटॉन समुदायाशी संबंधित असून हा इंडोनेशियाच्या सुलावेसी प्रांतात बुटॉन बेटावर राहतो. या समुदायाच्या लोकांच्या डोळ्यांचा रंग नैसर्गिक असून तो एका दुर्लभ जेनेटिक कंडिशनमुळे प्राप्त झाला आहे. या कंडिशनच्या अंतर्गत 42 हजारांपैकी एका व्यक्तीचे डोळे निळे होत असतात. छायाचित्रकार कॉर्चनोई पासारिबू यांनी या समुदायाच्या लोकांची छायाचित्रे टिपली आहेत.
या दुर्लभ जेनेटिक डिसऑर्डरचे नाव वारडेनबर्ग सिंड्रोम आहे. या सिंड्रोममुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यात ऐकण्यास समस्या, पिगमेंटेशमध्ये कमी, यामुळे डोळे निळ्या रंगाचे होतात किंवा एक डोळा निळा आणि दुसरा घाऱ्या रंगाचा होतो. शरीरात पांढऱ्या रंगाचे डागही निर्माण होतात. हा सिंड्रोम म्युटेशनमुळे होतो, हा भ्रूणाच्या विकासादरम्यानच होत असतो.
एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ट्रान्सफर
बुटॉन बेट या समुदायासोबत स्वत:च्या वन्यप्राण्यांसाठीही प्रसिद्ध आहे. अनोआ नावाच्या प्रकाराची म्हैस येथे आढळून येते. ही म्हैस केवळ दोनच ठिकाणी आढळते, ज्यात बुटॉनचाही समावेश आहे. हे बेट जगातील 129 वे सर्वात मोठ्या आकाराचे बेट आहे. तर इंडोनेशियातील 19 वे सर्वात मोठे बेट आहे. येथील जेनेटिक म्युटेशन एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ट्रान्सफर होत आहे.