For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीएनजी, हायब्रीड, ईव्ही वाहनांना लोकांची अधिक पसंती

06:23 AM Aug 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीएनजी  हायब्रीड  ईव्ही वाहनांना लोकांची अधिक पसंती
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या वाहन बाजारात सध्याला वाहन खरेदीदारांच्या दृष्टीने पाहता मोठा बदल होताना दिसतो आहे. सीएनजी, हायब्रीड आणि ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने) गाड्या लोकांची पसंती बनत आहेत, त्यांचा वाटा पेट्रोल गाड्यांच्या जवळपास पोहोचत आहे. भारतीय लोक आता सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे (ईव्ही) वळत आहेत. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (फाडा) जुलै 2026 च्या अहवालानुसार, पहिल्यांदाच पर्यायी इंधनावरील गाड्यांचा वाटा पेट्रोल गाड्यांच्या वाट्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

भारतीय वाहन बाजार वेगाने बदलत आहे. जिथे काही वर्षांपूर्वी लोक फक्त पेट्रोल आणि डिझेल गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देत होते. त्याच वेळी, आता मात्र लोकांचा कल बदलत आहे. सध्याला लोक सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर भर देत आहेत. वाहन विक्रेत्यांची संघटना फाडाच्या जुलै 2026 च्या अहवालानुसार, पहिल्यांदाच पर्यायी इंधनावरील गाड्यांचा वाटा पेट्रोल गाड्यांच्या वाट्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

Advertisement

फाडाच्या अहवालानुसार, जुलै 2026 मध्ये पेट्रोल गाड्यांचा वाटा 41.68 टक्के आहे, तर सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा एकत्रित वाटा 40.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे, आता या दोन्हींमधील तफावत केवळ 1.09 टक्क्यांची आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी जुलैमध्ये ही तफावत 13 टक्क्यांहून अधिक होती. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय ग्राहक अधिकाधिक प्रमाणात पर्यायी इंधन पर्यायांकडे वळत आहेत.

Advertisement
Tags :

.