For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरुंगात वास्तव्यासाठी लोक करतात खर्च

06:42 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
तुरुंगात वास्तव्यासाठी लोक करतात खर्च
Advertisement

या धोकादायक तुरुंगात नेमके आहे तरी काय?

Advertisement

तुरुंगात कुणी रात्र घालवू इच्छितो का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात धोकादायक तुरुंगापैकी एकमध्ये लोक पैसे देत रात्र घालविण्यासाठी येत आहेत. आम्ही याला मूर्खपणा समजू शकतो, परंतु प्रत्यक्षात हा  प्रकार काही औरच आहे. ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात कुख्यात तुरुंगापैकी एक एचएम प्रिजन पेंट्रिजमदये लोकांना एक रात्र वास्तव्यासाठी कमीतकमी 28 हजार रुपये खर्च करावे लागतात. कारण याला एक आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. हा तुरुंग कधीकाळी ऑस्ट्रेलियातील सर्वात कुख्यात गुन्हेगारांचे वास्तव्यस्थान होता. यात रोनाल्ड जोसेफ रयान आणि मार्क ‘चॉपर’ रीड यासारख्या गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांनीही शिक्षा भोगलेली आहे. मार्क हा ऑस्ट्रेलियात फासावर लटकविण्यात आलेला अखेरचा गुन्हेगार होता.

येथे येणारे अतिथी आता कधीकाळी गुन्हेगार फिरलेल्या हॉल आणि कक्षांमध्ये वास्तव्य करू शकतात. या खोल्यांचे भाडे 449 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच 28 हजार रुपये प्रतिरात्रीपासून सुरू होते. या तुरुंगादरम्यान इदक आलिशान अंडरग्राउंड स्वीमिंग पूल आहे, याच्या निर्मितीकरता 3 महिन्यांचा कालावधी लागला आहे, कारण याची निर्मिती या ऐतिहासिक तुरुंगाच्या संरचनेला कुठल्याही प्रकारचा धक्का न पोहोचविता करण्यात आली आहे.

Advertisement

कधीकाळी गुन्हेगारांचे वास्तव्य

या तुरुंगाला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत सुंदरपणे बदलण्यात आले आहे. यामुळे तुरुंगाची जुनी संरचनाही कायम आहे आणि  आत पंचतारांकित सर्व सुविधाही उपलब्ध आहेत. या हॉटेलमध्ये 19 सुइट असून ज्यांना 4 किंवा 5 खोल्यांना परस्परामंध्ये जोडण्यासाठी मोठ्या निळ्या दगडांच्या भिंतींना तोडण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत गुंबददार छत आणि दगडाच्या भिंती आहेत. तसेच यात सर्व समकालीन सुविधा आणि सामग्री आहे.

1851-1997 पर्यंत तुरुंग

यात हंटर लॅब हेयर आणि स्कीनकेयर समवेत सर्व आलिशान सुविधा आहेत आणि स्थानिक वस्तूंनी सुसज्ज एक आकर्षक मिनीबार देखील आहे. यात एक रिफ्लेक्शन गार्डनही असून तेथे पेंट्रिज जेलच्या इतिहासाविषयी सांगण्यात आले आहे. 1851-1997 पर्यंत हा एक तुरुंग होता, याला लोक ‘द ब्ल्यूस्टोन कॉलेज’, ‘कोबर्ग कॉलेज’ किंवा ‘कॉलेज ऑफ नॉलेज’ या टोपणनावाने संबोधित करायचे. याचे नाव एचएम पेंट्रिज जेल होते. हा 19 व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियात निर्मित सर्वात मोठा तुरुंग परिसर होता.

एचएम प्रिजनची स्थापना 1850 साली झाली होती. हा मेलबर्नपासून 8 किलोमीटर अंतरावरील पेंट्रिज नावाच्या भागात 140 एकरच्या शासकीय भूमीवर निर्माण करण्यात आला होता, ज्याला आता कोबर्गच्या नावाने ओळखले जाते. सरकारकडून तुरुंगाच्या खासगीकरणाच्या निर्णयाच्या अंतर्गत तुरुंगाला अधिकृतपणे बंद करण्यात आले आणि बहुतांश कैद्यांना एचएम प्रिजन बारवॉन येथे स्थानांतरित करण्यात आले. 1999 मध्ये व्हिक्टोरिया प्रांत सरकारने पेंट्रिजला स्वतंत्र रियल इस्टेट डेव्हलपर्सला विकले होते. 2023 मध्ये हे हॉटेल पहिल्यांदा खुले झाले होते.

Advertisement
Tags :

.