दुकानातील बाहुलीमुळे लोकांमध्ये दहशत
रात्री जिवंत होत असल्याचा दावा
जगातील अनेक गोष्टींना शापित ठरविण्यात आले आहे. यात खेळण्यांचा देखील समावेश आहे. पापी बाहुली किंवा खुनी बाहुली अशाप्रकारच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. तर एनाबेल डॉलवर तर पूर्ण चित्रपटच तयार करण्यात आला आहे. अशा स्थितीत लोकांना कधी अजब बाहुली दिसल्यावर ते घाबरू लागतात. ईडेनबर्गच्या एका चॅरिटी शॉपमदये ठेवण्यात आलेली एक बाहुली देखील काहीशी अशीच आहे.
दुकानात सजविण्यात आलेल्या या बाहुलीसमोरून जाणारे लोक बाहुली घाबरवत असल्याचा दावा करतात. ही जुनी बाहुली एडिनबर्गच्या मॉर्निंगसाइडमध्ये सेंट कोलंबा हॉस्पिसच्या दुकानात 90 युरेंमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. परंतु ही बाहुली अत्यंत रियलिस्टिक लुकमध्ये व्हायरल झाली आहे. आपण आजवर इतकी भयावह गोष्ट पाहिली नसल्याचा दावा अनेक स्थानिक लोकांनी केला आहे.
ही बाहुली रात्री जिवंत होत असल्याचा दावा एका इसमाने केला आहे. तर बाहुलीचे डोळे तेथून जाणाऱ्या प्रत्येकाचा पाठलाग करतात असे इतरांचे म्हणणे आहे. अनेक लोक या बाहुलीला सैतानी ठरवत आहेत.
कुणीतरी या बाहुलीला भयानक ठरविल्याचे मी सोशल मीडियावर पाहिले होते. मी याचा फोटो पाहिल्यावर ही आमच्याच दुकानातील बाहुली असल्याचे उमगले. मी पोस्टमधील काही कॉमेंट्सही वाचल्या. मग हा प्रकार रोखण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. याचमुळे मी बाहुलीवर ‘मी भयावह बाहुली नाही’ असा फलक लावल्याची माहिती चॅरिटी शॉपच्या मालकीण सिमोन यांनी दिली आहे.
या बाहुलीला एक चांगला खरेदीदार मिळू शकतो. लोकांना या बाहुलीच्या डोळ्यांमुळे समस्या आहे, कारण तिचे डोळे मानवी डोळ्यांप्रमाणेच दिसतात. ही बाहुली निर्माण करणाऱ्यांनी ती खऱ्याखुऱ्या बालिकेप्रमाणे दिसावी असा प्रयत्न केला असावा. ही बाहुली कुठल्याही लहान मुलांसोबत अत्यंत प्रेमळ दिसून येईल असे सिमोन यांनी म्हटले आहे.