For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनताभिमुख, लोकप्रधान अर्थसंकल्प : डॉ. प्रमोद सावंत

03:03 PM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनताभिमुख  लोकप्रधान अर्थसंकल्प   डॉ  प्रमोद सावंत
Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. विकसित भारतासाठी तो पोषक असून सुधारणेवर आधारित जनताभिमुख व लोकप्रधान असा अर्थसंकल्प आहे. भारताची एकंदरित प्रगती, विकास वेगवान करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भांडवली खर्चात वाढ करण्यात आली असून नारळ, काजू उत्पादन वाढीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाचे उत्पादन वाढणार असून जागतिक पातळीवर चालू असलेली भारताची प्रगती नेटाने होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.