महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहार, यूपीवासीयांचे मावळतीच्या सूर्याला नमन

12:41 PM Nov 08, 2024 IST | Radhika Patil
People of Bihar, UP bow to the setting sun
Advertisement

पंचगंगा घाटावर छटपुजेला सुरुवात : 200 जणांनी केला अर्घ्य देण्याचा विधी

Advertisement

कोल्हापूर :
बिहार व उत्तरप्रदेशावासियांनी गुऊवारी पंचगंगा नदी घाटावर छटपूजेची (सूर्यषष्ठी व्रत) सुरुवात केली. दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत छटपुजेसाठी नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून मावळतीच्या सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा विधी करण्यात आला. तब्बल दोनशेहून अधिक महिला व पुरुषांनी हा विधी केला. या विधीवेळी धार्मिक वातावरण निर्मितीसाठी उत्तरप्रदेश व बिहारमध्ये लोकप्रिय असलेली छटपूजेवरील गाणी ध्वनीक्षेपकाद्वारे लावली होती. तसेच बच्चे कंपनी व तऊण मंडळीकडून फटाकांची आतषबाजीही केली जात होती.

Advertisement

टाकाळा येथील राजर्षी शाहू पुर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीने छटपुजेचे संयोजन करण्यात आले आहे. गेल्या मंगळवारी नहा-खाय आणि बुधवारी खरना व्रत केलेले सर्वजण छटपुजेसाठी पंचगंगा नदीघाटावर आले होते. यामध्ये सानेगुरुजी वसाहत, राजारामपुरी, ताराबाई पार्क, राजेंद्रनगर, प्रतिभानगर, शिरोली, शाहूनाका, विक्रमनगर उचगाव, मोरेवाडी व मिरज येथील बिहार व उत्तरप्रदेशावासिय महिला व पुऊषांचा समावेश होता. महिला मंडळी तर चक्क साजशृंगाराने नटलेल्या होत्या. पुऊषांनी नवनवीन वस्त्रs परिधान केली होती. दरम्यान, छटपूजेसाठी सर्वांनी प्रथमत: नदी घाटावर पाच व सात ऊसांचा आपआपला चौक बांधला. या चौकाला नवीन साडी अर्पण केली तर चौकामध्ये पणती, नदी पाण्याने भरलेला कलश, फळे, श्रीफळ, ठेकूवा (खाद्य पदार्थ) यांचीही मांडणी केली. यानंतर दोनशेहून अधिकजण पणती, फुले, फळे, ठेकूवा पदार्थ हे एकत्र ठेवलेले सुप हातामध्ये घेऊन दुपारी 4 वाजता नदी पाण्यात उभे राहिले. पाण्यात उतरलेल्या वेळेपासूनच त्यांनी मावळतीच्या सूर्यदेवाला अर्घ्य देण्याच्या विधीला सुऊवात केली. नदी पाण्यात उभारलेल्या महिला व पुऊषांचा पाय घसऊन अनुचित प्रकार घडल्यास बचावकार्य करण्यासाठी महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान रेस्क्यू बोटीसह नदी पाण्यात तैनात होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत सूर्यदेवाला अर्घ्य देण्याच्या विधीची सांगता करण्यात आली. आता शुक्रवार 8 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून सकालीन अर्घ्य देण्याच्या विधीला सुऊवात केली जाईल. सकाळी 7 वाजता हा विधी थांबल्यानंतरच छटपूजेची सांगता करण्यात येईल.

कोल्हापुरातील अनुराधा अरविंद मिश्रा व शिरोली येथील रहिवासी कामेश्वर मिश्रा या दोघांनी 32 वर्षांपूर्वी पंचगंगा नदी घाटावर छटपूजा करण्याची नवी परंपरा सुरु केली. या दोघाकडूनच पुढील पाच वर्षे दीपावलीच्या सहा दिवसांनंतर येणारी छटपूजा नदी घाटावर केली जाऊ लागली. त्यानंतर अनुराधा यांचे बंधू ओम नारायण मिश्रा व सहकारी लल्लन कुमार यांनी पुढाकार घेऊन छटपूजेला लोकसहभागाचे स्वरूप आणले. त्यामुळे दोन व्यक्तींवर केल्या जाणाऱ्या छटपूजेमध्ये पन्नासहून अधिक बिहार व उत्तरप्रदेशावासियांची भर पडली.

आपली एक संघटना असावी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघ या नावाने 2005 साली संघसुद्धा स्थापन केला. तेव्हापासून आजतागायत संघातर्फे दरवर्षी छटपूजेचे आयोजन केले जाऊ लागले. गेल्या काही वर्षांपासूनच तर दरवर्षी दानशेहून अधिक बिहार व उत्तरप्रदेशावासिय लोक छटपूजा करत आहेत, असे संघाचे कार्याध्यक्ष ओम नारायण मिश्रा यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article